sanjay raut friends leave shivsena | एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसून येत आहे. अशात ठाकरे गटाला काही धक्के सुद्धा बसत आहे. ठाकरे गटातील अनेक महत्वाचे नेते शिंदे गटात गेले आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह शिवसेना खासदार संजय राऊतांना सुद्धा धक्का दिला आहे. संजय राऊतांची नुकतीच न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे.त्या सुटकेसाठी जामीनावर ज्या नेत्याने सही केली होती. तो नेताच आता शिंदे गटात गेला आहे.
भाऊसाहेब चौधरी असे त्या नेत्याचे नाव आहे. भाऊसाहेब चौधरी हे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा आहे. भाऊसाहेब चौधरी हे ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते. ते संजय राऊतांच्या अत्यंत निकटवर्तीय होते. संजय राऊतांच्या कोर्टाच्या कामाकडे भाऊसाहेब चौधरींचेच लक्ष होते.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. त्या जामीनावरील जामीनदार म्हणून भाऊसाहेब चौधरी यांनी स्वाक्षरी केली होती. संजय राऊतांसाठी त्यांनी स्वत:ची मालमत्ता आणि हमीपत्र चौधरी यांनी कोर्टात सादर केलं होतं. संयमी संघटक म्हणून त्यांची ओळख होती.
भाऊसाहेब चौधरी हे नेहमीच संजय राऊत यांच्यासोबत असायचे. ते संजय राऊतांच्या खुप जवळचे होते. शिवसेनेच्या पदाधिकारीपेक्षा त्यांची संजय राऊतांचे कट्टर समर्थक म्हणून जास्त ओळख होती. पण आता ते शिंदे गटात जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची ठाकरे गटातून आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे.
संजय राऊतांनी एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
bjp : फडणवीसांनी शिंदेंसोबत केली मोठी खेळी, शिंदे गटात जाणाऱ्या ‘या’ बड्या नेत्यालाच ओढलं भाजपात
raj thackeray : माध्यमांसमोर गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरे आपल्याच नेत्यांवर संतापले
Pune : हॅलो…श्रीमंत महीलांसोबत शरीरसंबंध ठेवा, तुम्हाला त्याचे पैसे देतो; पुण्यात थेट फोनवर ऑफर