grandfather and grandson death in beed | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेकांना या अपघातामध्ये जीवही गमवावा लागत आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका बैलगाडीचा अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये एका नातवासह आजोबांचाही मृत्यू झाला आहे. बैलगाडी थांबवून आजोबा त्या बैलाला पाणी पाजत होते. त्यावेळी बैल अचानक घाबरला. त्यामुळे काही कळण्याच्या आधीच बैल गाडीसह तळ्यात उधळला. यावेळी दोन नातू आणि आजोबा गाडीत होते. त्यामुळे ते सुद्धा तलावात गेले.
अशात एक नातू बैलगाडीच्या झटक्यामुळे बाजूला फेकला गेला. पण आजोबा आणि दुसरा नातू हे तलावात पडले. त्यामुळे त्यांना पोहता येत नसल्यामुळे आणि ऐनवेळी मदत न मिळाल्यामुळे त्या नातवाला आणि आजोबांना दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
संबंधित घटना ही बीडच्या कासारी बोडखा गावातील आहे. सय्यद कबीर बाशुमिया (६५) असे आजोबांचे नाव होते. तर मृत्यू झालेल्या नातूचे नाव अजमद सय्यद (१२) असे आहे. त्यांच्यासोबत सय्यद अत्तु हा सुद्धा होता. पण या अपघातात त्याचा जीव वाचला आहे.
ते तिघेही बैलगाडीमध्ये बसून शेतात जात होते. यावेळी त्यांनी गावाशेजारील तलावाजवळ बैलगाडी नेली. तिथे ते बैलांना पाणी पाजत होते. त्यावेळी पाणी पित असताना बैल अचानक घाबरला. त्यामुळे ते थेट तलावात गेले. यामध्ये आजोबा आणि एका नातवाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका नातवावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आजोबा आणि नातू हे तलावात असल्याचे कळताच गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघांनीही बाहेर काढले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर त्यांचे भोगलवाडी रुग्णायात नेण्यात आले होते. तिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
aditya thackeray : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंनीच रियाला पुरवली सुरक्षा? रीया म्हणाली मी स्वतःच सांगत होते की…
tanaji sawant : आरोग्यमंत्र्यांना ‘ओमिक्रॉन’ नावंही घेता येईना; सर्वांसमोर डोकं खाजवत म्हणाले…
shahrukh khan : शाहरुखची कातडी सोलून त्याला जिवंत जाळणार अन् सलमान-आमिरला फासावर चढवणार