Share

के एल राहुलच्या ‘त्या’ कृतीवर भडकले मैदानावरील पंच, मागावी लागली माफी, पहा व्हिडीओ

जोहान्सबर्गमधील कसोटी सामना लोकेश राहुलसाठी महत्वाचा सामना होता. हा सामना त्याच्या कायम लक्षात राहणार आहे. मालिकेला सुरूवात होण्याआधीच रोहित शर्माने माघार घेतली आणि कर्णधारपद के एल राहुलच्या पदरात उपकर्णधारपद पडले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतूनही विराटने माघार घेतली कर्णधारपदही त्यालाच मिळाले.

उपकर्णधारपद त्यानंतर बुमराहला मिळाले होते. के एल राहुलने जबाबदारीने ही कामगिरी पार पाडली. त्याने अर्धशतकी खेळी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण या सामन्यात के एल राहुलकडून एक चूक झाली आणि त्याला त्यासाठी माफी मागावी लागली. त्याच्या कृतीवर मैदानावरील पंचांनी त्याला समज दिला.

त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सर्वांसमोर के एल राहुल सॉरी म्हणाला आणि माफी मागितली. झाले असे की डावाच्या चौथ्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करत होता. जेव्हा तो चेंडू टाकायला आला तेव्हा राहुलने त्याला थांबवले. तोपर्यंत रबाडा धावत खेळपट्टीच्या अर्ध्यावर आला होता. त्याच्या या वागणुकीवर मैदानावरील पंच मराईस इरास्मुस यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यांनी लोकेशला वॉर्निंग दिली. राहुलनेही आपली चुकी मान्य केली आणि लगेच माफी मागितली. तो सॉरी म्हणाला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी के एल राहुलच्या या चुकीच्या वागणुकीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांनी के एल राहुलला ट्रोल केले आहे. तर अनेक लोकांनी त्याने लगेच माफी मागितल्याने त्याचे कौतुक केले आहे. के एल राहुल त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानावर तो कधीच हायपर झालेला आपल्याला दिसत नाही. चुक लक्षात येताच त्याने लगेच माफी मागितली.

के एल राहुल सध्या कर्णधार आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे असतात. त्याच्याकडून कोणतीही चुकी झाली तरी सोशल मिडीयावर लगेच लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात होतात. कोहली कर्णधार असतानाही आणि आताही सोशल मिडीयावर त्याला ट्रोल केले जात आहे.

https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1477950043709534209?s=20

महत्वाच्या बातम्या
एक एकराच्या शेतीपासून ५० कोटींची वार्षिक उलाढाल करणार कंपनीचा मालक, वाचा शेतकऱ्याचा प्रवास
ब्रेकिंग! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘RRR’ रिलीज डेट पुढे ढकलली, चाहत्यांना पाहावी लागणार वाट
अनोखी प्रेमकहाणी! पतीचे पार्थिव पाहून पत्नीनेही सोडले प्राण, एकाच चितेवर दिला मुखाग्नी
बदली झाल्यानंतरही नवाब मलिक समीर वानखेडेंची पाठ सोडेनात; आता म्हणाले…

खेळ

Join WhatsApp

Join Now