Homeताज्या बातम्याएक एकराच्या शेतीपासून ५० कोटींची वार्षिक उलाढाल करणार कंपनीचा मालक, वाचा शेतकऱ्याचा...

एक एकराच्या शेतीपासून ५० कोटींची वार्षिक उलाढाल करणार कंपनीचा मालक, वाचा शेतकऱ्याचा प्रवास

शेती म्हटलं की लोकांना जुगार वाटतो, कधी त्यातून पैसा येतो, तर कधी जातो. पण शेती जर नियोजन करुन केली, तर तुम्हाला चांगलेच उत्पन्न मिळते हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, जो शेतकरी शेती करुन वर्षाला ५० कोटींची उलाढाल करत आहे. राजस्थानमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याचे नाव योगेश जोशी असे आहे.

योगेश जोशी राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात राहतात. जीरा, बडीशेप, कोथिंबीरची शेती करुन वर्षाला ५० कोटींची उलाढाल करत आहे. योगेश यांनी १० वर्षांपुर्वी ७ सात शेतकऱ्यांसोबत मिळून शेती करण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्यासोबत ३ हजारपेक्षा जास्त शेतकरी जोडले गेलेले आहे.

योगेश यांचे वय फक्त ३५ वर्षे आहे. त्यांच्या घरच्यांची इच्छा नव्हती की योगेश यांनी शेतीत यावे. कुटुंबला असे वाटत होते की शिक्षण करुन योगेश यांनी नोकरी करावे. पण त्यांनी एग्रीकल्चरचे शिक्षण घेतले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला.

२००९ मध्ये शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला कल्पना नव्हती की पण त्यांनी त्यावर माहिती मिळवली आणि जीऱ्याची शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला एका एकरमध्येच शेती केली पण पहिल्यांदा त्यांचे या शेतीमध्ये नुकसान झाले.

नुकसान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जीरेची शेती कशी करायची, त्याच्या नियोजन केले. यावेळी त्यांना या शेतीत चांगलाच फायदा झाला. त्यानंतर योगेश यांनी शेतीची जागा वाढवली, तसेच त्यांनी वेगवेगळ्या पिकांची शेती करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी शेतीशी संबंधित वेगवेगळ्या कंपनींशी संपर्क साधले आणि त्यांच्यासोबत सुद्धा काम करण्यास सुरुवात केली. आता ते देश-विदेशातील अनेक कंपन्यानंसोबत काम करत आहे. त्यांनी जपानच्या एका कंपनीशी करारसुद्धा केला आहे, त्याकंपनीसाठी ते जीऱ्याचे उत्पन्न घेतात आणि ते त्या कंपनीला सप्लाय करतात.

तसेच योगेश सध्या दोन कंपन्या चालवत आहे एका कंपनीत ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिले जातात. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीबद्दल माहिती देतात. तर योगेश यांची दुसरी कंपनी प्रोडक्शन आणि मार्केटींगचे काम करण्याचे काम करत आहे.

योगेश यांच्या कंपनी ५० जण काम करत आहे. त्यांची पत्नीसुद्धा त्यांची कंपनी चालवण्यात महत्वाच्या पदावर काम करत आहे. त्यांच्या पत्नीने महिलांचा एक व्हॉट्सग्रुपसुद्धा तयार केला आहे, त्याच्या माध्यमातून ते महिलांना शेती करण्याचे प्रशिक्षण देत आहे.

योगेश यांनी शेतीमध्ये खुप वेगवेगळे प्रयोग केले आहे. योगेश यांच्या कामगिरीबद्दल त्यांना केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून त्या विविध पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती
नाईट सुटमध्येच विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी पोहोचली कतरिना, एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल
’83’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून रणवीर सिंग ढसाढसा रडला, म्हणाला, हे काय आहे मला माहिती नाही पण..