Share

.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?

नुकतेच मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या वसिम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांनी एक धक्कादायक ट्विट करत थेट गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. एरवी राजकारणासाठी गांधी घराण्यावर वारंवार टीका केली जाते. त्यांच्या विदेशी असल्यापासून ते राहुल गांधी जास्तकाळ परदेशात असतात यावर विरोधक वारंवार भाष्य करतात. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी राजकारणात असे आरोप सतत होत आलेलं आहेत.

जितेंद्र त्यागी यांनी देखील अशा प्रकारचे काही आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली, ते म्हणतात, करीना कपूरने मुस्लिमाशी लग्न केलं तर तिची मुलं देखील मुस्लिम झाली. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुले ब्राह्मण कशी झाली ? त्यागी यांनी अशा आशयाचे ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या ट्विटवर अकाउंटची शाश्वती आम्ही देत नाही मात्र यामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

https://twitter.com/narayantyagi_/status/1477957609898475523?s=24

कोण आहेत जितेंद्र त्यागी
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्मात प्रवेश केला. यासोबतच त्यांनी आपलं नावदेखील बदललं आहे. वसीम रिझवी यांचं नवं नाव जितेंद्र नारायण सिंह त्यागी झालं आहे. हो हे तेच त्यागी आहेत ज्यांनी सध्या आधी कुटुंबावर ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली आहे. मुस्लिम धर्म सोडल्यानंतर त्यांनी त्यागी हे हिंदू नाव स्वीकारले आहे.

धर्म बदलल्यावर काय म्हणाले होते त्यागी
जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी म्हटलं होत की, “येथे धर्मांतराचा काही मुद्दा नाही, मला इस्लाममधून काढण्यात आलं असताना कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा हा माझा हक्क आणि इच्छा आहे. सनातन जगातील सर्वात पहिला धर्म असून जितक्या चांगल्या गोष्टी येथे आहेत तितक्या कोणत्या धर्मात नाहीत. जुम्माला नमाज पठण केल्यानंतर शिर कापण्यासाठी फतवे काढले जात असताना अशा परिस्थिती कोणी आम्हाला मुसलमान म्हणणं याच्याने आम्हालाच लाज वाटते”.

वसीम रिझवी नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे वादात अडकले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी केलेली वक्तव्य इस्लाम तसंच मुस्लिमविरोधी असल्याची टीका करण्यात आली. मुस्लिमांमध्ये त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष होता.त्यागी झल्यानंतर मात्र मुस्लिमांचा त्यांच्यावर रोष अधिक वाढला आहे.

वसीम रिझवी यांनी इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या लिखाणावरुन खूप टीका झाली आहे. इतकंच नाही तर वसीम रिझवी यांनी इस्लाममध्ये सुधार करण्याची मागणीदेखील केली होती. कुराणमधील २६ आयती हटवल्या जाव्यात यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही केली होती.
ताज्या बातम्या
पुण्याच्या कर्वेनगरमध्ये तरुणीचा धिंगाणा, महिला पोलिसाला केली मारहाण; धक्कादायक व्हिडिओ आला समोर
५०० शेतकऱ्यांच्या मृत्युवर पंतप्रधानांनी केले धक्कादायक वक्तव्य?, म्हणाले, माझ्यासाठी मेलेत का?
व्यापाऱ्याकडे मिळाले पाचूपासून बनवलेले 1000 वर्षांपुर्वीचे शिवलिंग, किंमत वाचून हादराल
धक्कादायक! छोट्या भावाला जास्त एकर जमीन दिल्याने संतापला, वडिलांची गळा चिरून केली हत्या   

राजकारण

Join WhatsApp

Join Now