Homeताज्या बातम्यापुण्याच्या कर्वेनगरमध्ये तरुणीचा धिंगाणा, महिला पोलिसाला केली मारहाण; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

पुण्याच्या कर्वेनगरमध्ये तरुणीचा धिंगाणा, महिला पोलिसाला केली मारहाण; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

पुण्याच्या कर्वेनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्वेनगरमधल्या पोलिस चौकीत एका तरुणीने चांगलाच धिंगाणा घातला आहे. यावेळी त्या तरुणीने महिला पोलिसाला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

पुण्याच्या कर्वेनगरमधील शाहु कॉलनीमध्ये एक तरुणी आणि तिची आई धारदार शस्त्रांनी गाड्यांची तोडफोड करत होत्या. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी वारजे पोलिस घटनास्थळी पोहचले आणि तरुणीला आणि तिच्या आईला पोलिस चौकीत आणले.

त्यावेळी तरुणीने पोलिस चौकीतही धिंगाणा घातला. इतकेच नाहीतर चौकीतील दामिनी पथकातील एका महिला पोलिसाला मारहाणही केली. यावेळी तरुणीने महिला पोलिसाला शिवीगाळही केली आहे. तिथे उपस्थित असलेल्यांनी हा काढला आहे.

याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय ४०) आणि मुलगी मृणाल किरण पाटील (वय २१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना पोलिस चौकीत आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. फिर्यादी यांच्या श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली होती. याचा राग धरुन मृणाल फिर्यादीच्या मुलावर धावून गेली होती. तसेच फिर्यादींना शिवीगाळ करुन हाताने मारहाणही केली.

त्यानंतर संजना पाटील यांनी कोयत्याने फिर्यादीच्या दुचाकीवर वार केले आणि गाडीची तोडफोड केली. तसेच पोलिसांनी जेव्हा त्यांनी पकडून नेले तेव्हा तरुणीने महिला पोलिसावर हल्ला केला. तसेच माझा गुन्हा काय असे म्हणत तिथे धिंगाणा घातला. त्यावेली तरुणीने महिला कॉन्स्टेंबलची शर्टची बटणेही तोडली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा त्या तरुणीवर दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
५०० शेतकऱ्यांच्या मृत्युवर पंतप्रधानांनी केले धक्कादायक वक्तव्य?, म्हणाले, माझ्यासाठी मेलेत का?
बेरोजगारी, कर्जबाजारीला कंटाळून इंजिनीअर मुलाने आईचा केला खून, नंतर स्वत:लाही संपवलं
धक्कादायक! छोट्या भावाला जास्त एकर जमीन दिल्याने संतापला, वडिलांची गळा चिरून केली हत्या