Homeताज्या बातम्याधक्कादायक! छोट्या भावाला जास्त एकर जमीन दिल्याने संतापला, वडिलांची गळा चिरून केली...

धक्कादायक! छोट्या भावाला जास्त एकर जमीन दिल्याने संतापला, वडिलांची गळा चिरून केली हत्या

झारखंडमधील येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जमिनीच्या वाट्यामुळे नाराज झालेल्या मुलाने आपल्याच वडिलांचा खून केला. हे संपूर्ण प्रकरण ३१ डिसेंबरच्या रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित घटना ही संग्रामपूर गावातील चुन्नी यादव यांच्या घरातील आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरात संपत्तीवरुन वाद सुरू होता. चुन्नी यादव यांना दोन मुलं होते, मोठा सुबोध यादव आणि धाकटा मुलगा भैरव. वडिलांनी लहान मुलाला ३५ एकर जमीन दिली होती, पण मोठ्या मुलाला फक्त अडीचच एकर जमीन दिली होती. त्यामुळे मोठा मुलगा आपला हिस्सा मागत होता.

गोड्डा पोलिस कॅप्टन वायएस रमेश यांनी सांगितले की, मोठ्या भावाला कमी आणि लहान भावाला जास्त जमीन हेच यांच्या घरातील वादाचे कारण होते. चुन्नी यादव यांच्या मृत्युबाबत पोलिसांना १ जानेवारीला माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी २४ तासाच्या आत मोठ्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

महागामा उपविभागीय पोलीस अधिकारी एसएस तिवारी, एसएचओ दीपक कुमार आदींच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली होती. तपासात पोलिसांचा संशय मोठ्या मुलावर गेला होता. यानंतर कठोर चौकशी केल्यानंतर मोठा मुलगा सुबोध यादव याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सुबोधने सांगितले की, ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वजण झोपले असताना त्याने स्ट्रॉ कटरने वडिलांचा गळा चिरून खून केला आणि नंतर येऊन शांत झोपला. या घटनेत वापरलेल्या चिंध्या आणि रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत.आरोपी सुबोध यादवची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
आयटम म्हणत मुलीची छेड काढणे पोलिस पुत्राला पडले महागात, मुलीने ‘असा’ शिकवला धडा
“मोदीजी आता चीनची वाट लावणार, त्यांचे डोळे तर बघा, लाल लाल झालेत”
समीर वानखेडेंची झाली बदली, आता ‘या’ ठिकाणी सांभाळणार महत्वाची जबाबदारी