महाराष्ट्र नवनिर्माण सेना( मनसे)आणि कार्यकर्ते नेहमीच त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. सध्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, मराठी अक्षरातून लावल्या जाणाऱ्या पाट्याला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना कार्यकर्त्यांनी दिलेला जबरदस्त इशारा. मराठीमधून पाट्या करण्यावर व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. यावर मनसे कार्यकर्त्यांनी धमकीवजा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात आणि मोठ्या ठळक अक्षरात असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशा प्रस्तावाला मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या या मराठीत असणार आहेत. मात्र, मराठी पाट्या असाव्यात अशी मागणी याआधीपासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आला आहे.
त्यामुळे, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत या निर्णयाचे श्रेय मनसेचे असल्याचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यातच आता प्रस्तावाला मंजुरी मिळाली म्ह्णून मराठी पाट्या कराव्यात यासाठी मनसे अधिकच आक्रमक झाले आहेत. मात्र, याला व्यापाऱ्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. यावर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी धमकीवजा इशारा दिला की, पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की, दुकानाच्या काचा बदलण्याचा खर्च जास्त आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. “ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा??” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मुंबईत शिवसैनिक अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन दुकानदारांना यासंबंधी सूचना द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या परिसरात गुरुवारी शिवसैनिकांकडून दुकानदारांना स्मरणपत्रे वाटण्यात आली. या माध्यमातून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची आठवण व्यापाऱ्यांना करुन देण्यात आली.
तर दुसरीकडे, राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्याविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. त्यामुळे दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहीताना कोणत्या भाषेचा वापर करावा, हा व्यापाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. दुकानदारांना व्होटबँक पॉलिटिक्सपासून दूर ठेवा. दुकानदार मराठी पाट्या लावेल, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती त्याच्यावर नको,असे विरेन शाह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
‘असं करून विराट कधीच युवा खेळाडूंचा आदर्श बनू शकत नाही’, गौतम गंभीरच्या कानपिचक्या
पुजारा-रहाणेचा खेळ खल्लास, त्यांच्या जागी येणार ‘हे’ दोन फलंदाज, सुनील गावस्करांनी केले स्पष्ट
महिलेच्या गाडीला फळवाल्याचा चुकून धक्का लागला; त्यानंतर महिलेने रागाच्या भरात जे केले ते पाहून संताप येईल