Share

मोदींच्या रॅलीत घातपात करण्याचा डाव? पंजाबमधून तीन शार्प शुटर अटकेत, हॅन्ड ग्रेनेडही जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबचा दौरा रद्द करून दिल्लीला परतावे लागले. या घटनेने सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे. देशभरातून पंजाब सरकारवर टीका होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन, संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पंजाब पोलिसांतील काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातच आता पंजाब पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. यांचा मोदींच्या रॅलीत घातपात करण्याचा डाव होता का, याबाबत आता पोलिसांनी सप्ष्टीकरण दिले आहे.

कॅनडामध्ये बसलेल्या कुख्यात गुंड अर्शदीप सिंग उर्फ ​​अर्श दलाचा शार्प शूटर गुरप्रीत गोगी याच्यासह तीन गुन्हेगारांना अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन ९ एमएम पिस्तुल, दोन हातबॉम्ब आणि १८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापैकी गोगीचे नाव गेल्या वर्षी तरनतारनच्या भिखीविंड शहरात पकडलेल्या टिफिन बॉम्ब प्रकरणातही होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

एसएसपी चरणजीत सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही शस्त्रे परदेशातून पाठवण्यात आली असण्याची शक्यता आहे, प्राथमिक चौकशीत असे संकेत मिळाले आहेत. एसएसपी चरणजीत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये व्यत्यय आणण्याचा कोणताही कट असल्याचा नकार दिला आहे. आतापर्यंत अशी कोणतीही गोष्ट समोर आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, मात्र हे लोक पंजाबमध्ये धार्मिक स्थळांवर स्फोट घडवून दहशत पसरविण्यासाठी तयार करण्यात येत होते, असे म्हंटले आहे.

एसएसपी म्हणाले की, पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, स्फोटकं आणि शस्र्साठा बाळगण्याप्रकरणही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तिघांची कार नाकाबंदीच्या ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाडसी कारवाई करूनत्या तिघांना जेरबंद केले.

एसएसपी चरणजीत सिंग सोहल यांनी सांगितले की, विशेष शाखेचे उपनिरीक्षक गुरतेज सिंग यांनी पोलीस दलासह मेहना गावाजवळील नाल्याजवळ नाकाबंदी केली होती. यादरम्यान काळ्या रंगाचे पिक्का वाहन क्रमांक PB04AC-२८३१ याला पोलीस पथकाने चुगाव गावाच्या बाजूने थांबण्याचा इशारा दिला असता कार स्वारांनी थांबण्याऐवजी पोलीस पथकावर चढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे बॅरिकेडही तोडले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना रोखले, त्यानंतर कारमधील तीन जणांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी आरोपींनी पोलिसांकडे पिस्तूल दाखवून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

आरोपींनी पोलिसांच्या दिशेने पिस्तूल दाखवले आणि एका आरोपीने पोलिस पथकावर कारमध्ये ठेवलेले दोन हातबॉम्ब फेकण्याची धमकी दिली. यावर पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले. गुरप्रीत सिंग उर्फ ​​गोपी रा. शादीवाला कोटिसे खान, वरिंदर सिंग उर्फ ​​विंदा रा. मखू जिल्हा फिरोजपूर आणि बलजीत सिंग रा. फतेहगढ पंजतूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी गुरप्रीत गोपीकडून९ एमएमच्या पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे, वरिंदर सिंग विंदा याच्याकडून एका पिस्तुलासह १२ जिवंत काडतुसे आणि आरोपी बलजीत सिंगकडून दोन हातबॉम्ब जप्त केले आहेत.

महत्वाच्या बातम्या
मामा गाडी घेऊन लवकर या, आमचा चौघांचा गळा चिरलाय; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
जगात सगळ्यात भेकड आणि पळपूटी जमात म्हणजे…; मराठी अभिनेत्याने मोदीभक्तांना सुनावले
विशाल ददलानी यांच्या वडिलांचे निधन; शेवटच्या क्षणीही वडिलांना पाहता येणार नसल्याने गायक झाला भावूक

 

इतर क्राईम राजकारण

Join WhatsApp

Join Now