Homeताज्या बातम्यामामा गाडी घेऊन लवकर या, आमचा चौघांचा गळा चिरलाय; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

मामा गाडी घेऊन लवकर या, आमचा चौघांचा गळा चिरलाय; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना विष पाजून त्यांचा गळा चिरला आहे. त्यानंतर त्याने स्वत: विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना ही लातूरच्या रेणापूर याठिकाणी घडली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या मुलांचा आणि पत्नीचा गळा चिरला होता, त्यानंतर शेतकऱ्याने स्वत: विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी १४ मुलाला शुद्ध आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

शुद्धीवर आलेल्या मुलाने मामाला फोन करुन या घटनेची माहिती दिली. यानंतर मामाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिघांची प्रकृती स्थिर आहे.

लातूर येथील राहणारे शेतकरी आतिष बाबूराव नरके यांनी गुरुवारी आपण फिरायला जाऊ असे सांगत पत्नी विशाखा, मुलगा पारस (वय-१४) आणि मुलगा लोकेश (वय-१२) यांना दुचाकीने अंबाजोगाईला घेऊन गेले. पण याठिकाणी राहण्यासाठी लॉज मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये जेऊ घातले आणि ते लातूरला निघाले.

यावेळी आतिष बाबूराव नरके यांनी गाडी शेरा गावाकडील एका रस्त्यावर वळवली. त्यानंतर त्यांनी गाडी रस्त्यातल्या एका शेतात लावली. या ठिकाणी नरके यांनी टॉनिक असल्याचे सांगत दोन्ही मुलांना आणि पत्नीला ते पाजलं. पण ते विष होतं. त्यानंतर ते तिघे बेशुद्ध झाले.

शुद्ध हरपल्यानंतर नरके यांनी तिघांच्या गळे ब्लेडने चिरले. त्यानंतर स्वत: विष प्राशन करुन त्यांनीही ब्लेडने गळा चिरुन घेतला. पण यावेळी १४ वर्षाच्या मुलाला शुद्ध आली. त्याने तातडीने वडिलांचा मोबाईल घेतला आणि आपल्या मामाला फोन लावला. मामाने तातडीने घटनास्थळी घेतली. तिथे पोहचल्यानंतर त्यांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात नेले, त्यामुळे चौघांचाही जीव वाचवता आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
विनवणी करूनही लावली थुंकी चाटायला; भाजप कार्यकर्त्यांच्या अमानुष कृत्याचा व्हिडीओ आला समोर..
११ वर्षांच्या चिमुकलीने दिला बाळाला जन्म; आईवडिलांसह डॉक्टरांनाही बसला धक्का
उदयनराजे व्हिजन असलेले लीडर आहे, साताऱ्याने त्यांना जपले पाहिजे- नाना पाटेकर