Homeइतरजगात सगळ्यात भेकड आणि पळपूटी जमात म्हणजे…; मराठी अभिनेत्याने मोदीभक्तांना सुनावले

जगात सगळ्यात भेकड आणि पळपूटी जमात म्हणजे…; मराठी अभिनेत्याने मोदीभक्तांना सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबचा दौरा रद्द करून दिल्लीला परतावे लागले. या घटनेने सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच मराठी अभिनेता किरण माने यांची या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी फेसबुक वरती मोदींविरोधात पोस्ट केली होती. त्यांनतर मोदी समर्थकांनी त्यांना यावरून ट्रोल केलेले दिसले. किरण माने यांनी त्यानंतर समर्थकांना अशी उत्तरे दिली कि,समर्थकांनी आपले अकाऊंटच डिलीट केले. याबद्दल मानेंनी पोस्ट केली आहे, यावर सध्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ते जाहीर सभाही घेणार होते. परंतु त्या मार्गावर शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यामुळे पंतप्रधान पंजाब दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले. या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक मार्मिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

“राजा पळपुटा निघाल्यावर झालेला प्रजेचा चडफडाट बघून लै हसतोय ! रहाता राहीला माझा प्रश्न.. मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मावळा हाय. तुमच्यासारखी भिकार जमात माझा ‘केस’बी वाकडा करू शकत नाय”, अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी फेसबूक अकाऊंट वरून करत मोदींवर निशाणा साधला होता. यावर मोदी समर्थकांनी मानेंना धमक्या दिल्या.

यावर किरण माने यांनी पुन्हा पोस्ट केली कि, “ए, कशाला लिहीतो रे राजकीय पोस्ट. आमच्या नेत्याला काही बोललास महागात पडेल.” , “आमच्या पक्षाविरोधात बोलतो? तू कुठं रहातोस. पत्ता दे. तुला तिथं येऊन मारतो.” अशे लै लै लै मेसेज येऊन पडत्यात. मी हिंगलूनबी इचारत नाय असल्यांना. मला बोट बी लावायचा दम नाय कुनाच्यात.

तसेच, माने यांनी पोस्टमध्ये बरेच मुद्दे मांडत आपले विचार मोदी समर्थकांपर्यंत पोहचवले. यांनतर ज्या समर्थकांनी किरण माने यांना ट्रोल केले, धमकी दिली होती त्यातील काहींनी माफी मागितली तर काहींनी चक्क फेसबुक अकाऊंट दिलीत केले. यामुळे आता किरण माने यांनी पुन्हा एकदा याबाबत फेसबूक पोस्ट केली आहे आणि मोदी समर्थकांची चांगलीच मजा घेतली आहे. त्यांनी पोस्टवर, एका समर्थकांचा आणि त्यांच्या मधील झालेल्या संभाषणाचा काढलेला स्क्रिनशॉट देखील पोस्ट केला आहे.

“साॅरी साॅरी म्हणत म्हणत या जगी हे आले रे !” जगात सग्ग्गळ्यात भेकड आनि पळपुटी जमात आसंल तर ती सोशल मिडीयावर अर्वाच्य शब्दांत ट्रोल करनारी जमात ! दोन उदाहरनं बघा.. एकानं सपशेल माफी मागीतली आनि एकजन अकाऊंट डिलीट करून पळून गेला. एक भेकड , एक पळपुटा !! भिडा सरळसरळ.. लै टिवटिव करायला लागला तर सायबर क्राईमला कळवा. नाय पाया पडला तर नांव बदलून ठेवीन !!! अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी नव्याने केली आहे. यावर लोकांनी किरण मानेंबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या
भाजप कार्यकर्त्यांनी मुस्लिम युवकाला बेदम मारहाण करत थुंकी चाटायला लावली; पहा व्हिडीओ
केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मुंबईची भावना यादव मुलींमध्ये पहिली
जाणून घ्या.. कोणतीही मेहंदी किंवा कलर न लावता नैसर्गीकरित्या केस काळे करण्याचा उपाय..