ऑस्कर (Oscar) म्हणजेच अकादमी पुरस्कार २०२३ भारतीयांसाठी नवीन आनंदाची बातमी घेऊन आला आहे. भारतातील ‘द एलिफेंट विस्परर्स’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी सकाळपासूनच सर्वांच्या नजरा ९५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे वेधल्या होत्या.
एकामागून एक विजेत्यांची नावे समोर येत आहेत. त्या वेळी सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ‘द एलिफेंट विस्परर्स’ या भारतीय चित्रपटाचे नाव जाहीर झाल्यावर प्रत्येक भारतीयाने आनंदाने उडी मारत आनंद साजरा केला.पहिला ऑस्कर पुरस्कार भारताच्या झोळीत आला आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले आहे.
‘द एलिफेंट विस्परर्स’ ८ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. ही ३९ मिनिटांचा भारतीय अमेरिकन शॉट डॉक्युमेंट्री फिल्म आहे. यामध्ये एका जोडप्याच्या आणि त्यांच्या हत्तीच्या बाळाच्या बॉन्डिंग कथा सुंदरपणे चित्रित करण्यात आला आहे. तर गुनीत मोंगा या लघुपटाचे निर्माते आहेत.
‘द एलिफेंट विस्परर्स’च्या कथेबद्दल सांगायचे तर, हा दक्षिणेतील बोमन आणि बेबी एलिफंट नावाच्या बेली आणि रघु या जोडप्याभोवती फिरतो. एका अनाथ हत्तीची काळजी घेण्यासाठी, एक कुटुंब तयार करण्यासाठी एक जोडपे आपले जीवन कसे समर्पित करते हे या कथेत दाखवण्यात आले आहे.
पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करणाऱ्या आणि जंगलाच्या गरजा जाणून घेणाऱ्या लोकांची ही कथा आहे. हा चित्रपट मानवांचे हत्ती आणि इतर प्राण्यांशी असलेले नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. ‘द एलिफेंट विस्परर्स’ हा तमिळ भाषेतील डॉक्युमेंटरी चित्रपट आहे.
नुकतेच प्रियंका चोप्राने ही डॉक्युमेंटरी पाहिली होती.त्यावेळी प्रियंकाने या डॉक्युमेंटरीचे तोंड भरून कौतुक केले. प्रियांका म्हणाली की, ‘भावनांनी भरलेली खोड. नुकताच मी पाहिलेला हृदयस्पर्शी माहितीपट. मला ती खूप आवडली. ही अप्रतिम कथा जिवंत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.’
महत्वाच्या बातम्या
शीतल म्हात्रे अश्लील व्हिडीओ प्रकरणात आदित्य ठाकरेंची एंट्री; दिली ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रीया
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात
फक्त ७५ घरे असलेल्या ‘या’ गावाने देशाला आजवर दिलेत ४७ IAS आणि IPS अधिकारी; वाचा त्या गावाची भन्नाट स्टोरी