Politics: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ माॅर्फ करून त्यावर अश्लील मजकूर लिहून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे खापर शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर फोडले होते.
शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना थेट ठाकरे गटावर आरोप केले. खोटा व्हिडिओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला ठाकरे गटाकडून खोचक शब्दात प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
या व्हायरल व्हिडिओवरून शीतल म्हात्रे यांचे समर्थक चांगलेच संतापले आहेत. या कार्यकर्त्यांनी संशयिताला काळ फासला आहे. यादरम्यान, आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवायची म्हणजे बेशरमपणा आहे, असे म्हणत आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शितल म्हात्रे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
तसेच, असे व्हिडिओ माॅर्फ कसे होऊ शकतात? नक्की झालं काय? हे पाहणं अधिक महत्त्वाचा आहे. कारणं असे व्हिडिओ माॅर्फ होऊ लागले तर ते सर्वांसाठी धोक्याचा आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिली. गोरेगावमध्ये शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलले.
दरम्यान, शनिवारी ११ मार्चला दहिसरमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.भूमिपूजन, उद्धाटन, रॅली आणि भाषण पार पडले. हा कार्यक्रम जवळजवळ ४.३० तास सुरू होता.
व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. हा व्हिडिओ मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर विनयभंगासारखा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
राज ठाकरेंना मोठा धक्का! सर्वात विश्वासू नेत्यावर गंभीर आरोप करत पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र
‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते माधुरी दीक्षितचे अफेअर; ब्रेकअपचं कारण ऐकून धक्का बसेल
रोहित शर्माने भर मैदानात इशान किशनवर उचलला हात; कारण ऐकून व्हाल हैराण, पहा व्हिडिओ