Share

भारताच्या एका चुकीमुळे पाकिस्तानवर सुटले मिसाईल, धक्कादायक माहिती आली समोर

भारताच्या एका चुकीमुळे पाकिस्तानात एक मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे. ९ मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना एक अपघात होता. तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र पाकिस्तानवर सुटले होते. (indian missile in pakistan)

सरकारने उच्चस्तरीय न्यायालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाने या घटनेबद्दल दिलगीर व्यक्त केली. पण चांगली गोष्ट म्हणजे या अपघाती हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण सगळीकडे ही गोष्ट चर्चचा विषय ठरली आहे.

पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे डीजी मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत घेतलीय त्यावेळी ते म्हणाले की, ९ मार्चला संध्याकाळी ६.४३ वाजता आमच्या एअर डिफेन्स ऑपरेशन सेंटरमधून भारतातून पाकिस्तानात येताना आम्हाला एक मिसाईल दिसली.

ती मिसाईल पाकिस्तानी हवाई हद्दीचे उल्लंघन करत मियां चन्नू परिसरात संध्याकाळी ६.५० वाजता पडले. ही मिसाईल सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असावी, असा अंदाज पाकिस्तानेन लावला आहे. पण ही मिसाईल खाली असल्यामुळे मिसाईलमुळे मोठ्या प्रमाणात काही नुकसान झाले नाही.

पाकिस्तानी लष्कराने प्रक्षेपणाचा नकाशा जारी केला आणि दावा केला की, पाकिस्तानमध्ये पडणारे क्षेपणास्त्र हरियाणातील सिरसा येथून डागण्यात आले होते. क्षेपणास्त्राने प्रक्षेपण स्थळापासून पाकिस्तानच्या मियां चन्नू भागापर्यंतचे २६१ किमीचे अंतर ७ मिनिटांत कापले. सीमेपासून १२४ किमी अंतर कापल्यानंतर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या आत पडले, ज्यामुळे काही घरांचे नुकसान झाले.

बाबर इफ्तिखार म्हणाले की, भारतीय क्षेपणास्त्राने त्यावेळी भारत आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी उड्डाणे धोक्यात आणली होती, हे निदर्शनास आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत पाकिस्तानने भारताकडे उत्तर मागितले आहे.

पाकिस्तानात पडलेले क्षेपणास्त्र कोणते होते हे भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले नसले तरी, संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सांगितले की ते सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस होते. मात्र, सिरसा येथून क्षेपणास्त्र डागल्याचा पाकिस्तानचा दावा योग्य नाही, असे भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बंगळुरुमध्ये कसोटी सामना जिंकून भारतीय संघ रचणार इतिहास; ९० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार विक्रम
‘पावनखिंड’नंतर ‘हा’ ऐतिहासिक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पार पडला मुहुर्तसोहळा
दोन तासांच्या चौकशीत काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now