Share

IND vs NZ : शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या रोमांचक सामन्यात भारताचा विजय, ‘हे’ खेळाडू ठरले विजयाचे हिरो

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्याची सुरुवात केली. पण रोहित काही खास करू शकला नाही आणि 38 चेंडूत 34 धावा करून बाद झाला.

रोहितच्या पाठोपाठ आलेल्या विराट कोहलीलाही चांगली कामगिरी करता आली नाही आणि तो 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात फक्त शुभमन गिल थोडक्यात बचावला. त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या आणि 50 व्या षटकात तो बाद झाला. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. सुर्यकुमार यादवने 31 चेंडूत 25 धावा केल्या.

भारतीय फलंदाजांची कामगिरी
रोहित शर्माने 38 चेंडूत 34 धावा
शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावा
विराट कोहलीने 10 चेंडूत 8 धावा
इशान किशनने 14 चेंडूत 5 धावा
सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 31 धावा
हार्दिक पांड्याने 38 चेंडूत 28 धावा
वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 12 धावा
ठाकूरने 3 चेंडूत 3 धावा
कुलदीप यादव – 6 चेंडूत 5 धावा
शमी – 2 चेंडूत 2 धावा

भारतीय गोलंदाजांची कामगिरी
मोहम्मद शमी – 10 षटकात 69 धावा आणि 1 बळी
मोहम्मद सिराज – 10 षटकात 46 धावा आणि 4 बळी
हार्दिक पांड्या – 7 षटकात 70 धावा आणि 1 बळी
कुलदीप यादव – 8 षटकात 43 धावा आणि 2 बळी
शार्दुल ठाकूर – 7.2 षटकात 54 धावा आणि 2 बळी
वॉशिंग्टन सुंदर – 7 षटकात 50 धावा आणि 0 बळी

न्यूझीलंडला सुरुवातीला चांगली कामगिरी करता आली नाही आणि चषक जिंकता आला नाही. धावांचा वेग मंदावत राहिला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या फिन ऍलनने 39 चेंडूत 40 धावा केल्या. याशिवाय सुरुवातीच्या क्रमात कोणीही विशेष काही करू शकले नाही.

8 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेल ब्रासवेलने संघाची बुडती नौका सांभाळत शतक झळकावले. कमी चेंडूत धावा काढण्याचे काम त्याने केले. मिचेल ब्रेसवेल न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 78 चेंडूत 140 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या
होंडाने आणली भन्नाट बाईक! एक लीटरमध्ये जाते तब्बल १०० किलोमीटर; वाचा फिचर्स
कौटुंबिक अडचण सांगत सोडली मॅच अन् नंतर दिसला रोहीत पवारांसोबत; केदार जाधवच्या लबाडीचा कळस
पुण्यात स्पर्धा असल्यावर पुण्याचेच पैलवान विजयी केले जातात; महाराष्ट्र केसरीच्या वादात ‘या’ बड्या नेत्याची उडी
नियतीचा खेळ! जुळे भाऊ एकमेकांपासून ९०० किमी दूर; तरी एकाच वेळी एकसारखाच झाला मृत्यू

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now