पुणे येथे नुकतीच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या माती गटातील अंतिम फेरीच्या निकालाबद्दल वाद सुरू आहे. या अंतिम फेरीत पराभूत झालेला सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला. परंतु नंतर हा निकाल अयोग्य असल्याच्या चर्चा होतांना दिसताय. पैलवान सिकंदर शेख याच्या पराभवाला आयोजकच जबाबदार आहेत असे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आरोप केला आहे.
रमेश बारसकर हे सिकंदर शेखला आर्थिक तसेच खुरकासाठी मदत करतात. सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या नेटकाऱ्यांच्या भावना आहेत.आता या अन्यायाबद्दल सिकंदर शेखच्या गावाचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रमेश बारसकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, जेव्हाही पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते त्या -त्या वेळी दुजाभाव केला जातो. पुण्यात स्पर्धा झाल्यानंतर केवळ पुण्यातीलच स्पर्धक कसे विजयी होतील अशा पद्धतीनेच निर्णय घेतले जातात.
आमचा आता कुस्तीगीर परिषदेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता स्वतंत्र कुस्ती फेडरेशन स्थापन करून स्वतःच महाराष्ट्र केसरी भरवू, जेणेकरुन तेथे कोणत्याही पैलवानावर अन्याय होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
पंच मारुती सातव यांच्यावर सिकंदर शेख च्या विरोधात चार गुण दिल्याचे आरोप होतांना दिसताय. या चार गुणांच्या निर्णयामुळेच सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
या अन्यायाबद्दल स्वतः पैलवान सिकंदर शेख यांनीदेखील त्यांच्या मनातील शल्य बोलून दाखवले आहे. तर रमेश बारसकर यांनी आयोजकांवरच आरोप केले आहेत. पुण्यात स्पर्धा झाली की पुण्याचाच पैलवान जिंकतो असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अशात महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या पंचांना धमकीचे फोनही आले होते. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. पण आता हा वाद थांबवण्यासाठी सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेने मार्ग शोधून काढला आहे. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय या संस्थेने घेतला आहे.
अंबाबाई तालीमीचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये जो कुस्ती जिंकेल त्याला महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची चांदीची गदा दिली जाणार आहे.
तसेच महाराष्ट्र महाकेसरीचा खिताब दिला जाणार आहे. सिकंदरने या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. आता सर्वजण महेंद्र गायकवाडच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा करत आहे. मुंबई पोलिस दलातील संग्राम कांबळे यांनी पंच मारुती सातव यांना धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
पैलवान सिकंदर शेखचे आईवडील भडकले; म्हणाले, ‘आमच्या मुलावर अन्याय झालाय, यापुढे..’
पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार, सिकंदर-महेंद्रचा वाद मिटवण्यासाठी पुन्हा होणार कुस्ती
सिकंदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना फोनवरून धमकी; सिंकदर शेख म्हणाला..