अमेरिकेच्या धमकीनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदी केले आहे. भारताने ठरवले आहे की ते रशियाकडून स्वस्त क्रूड खरेदी करणार आहे. कच्चे तेल रुपयात आणि रुबलमध्ये खरेदी करण्याचा करार झाला आहे. हा करार होताच भारतीय चलन मजबूत होईल. (india accept ruissias crude oil deal)
तसेच भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात राहू शकतात. खरं तर, तेल करारापूर्वी, अमेरिकेने म्हटले होते की, सर्व देशांना आमचा संदेश आहे की आम्ही लादलेल्या आणि शिफारस केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. कच्च्या तेलाची रशियन ऑफर भारताकडून स्वीकारली जाऊ नये, तसेच ऑफर स्विकारल्यास निर्बंधांचे उल्लंघन होईल.
अशात पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) रशियाकडून २० लाख कच्चे तेलाचे बॅरल सध्याच्या आंतरराष्ट्रीय दरांच्या तुलनेत मोठ्या सवलतीने खरेदी केले आहे. IOC ने मे महिन्यातील डिलिव्हरीसाठी तेल दिनांकित ब्रेंटच्या तुलनेत २० ते २५ डॉलर प्रति बॅरलच्या सवलतीने खरेदी केले आहे.
अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर रशियाने भारत आणि इतर मोठ्या आयातदारांना सवलतीच्या दरात तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी फक्त १.३ टक्के तेल रशियाकडून खरेदी करतो.
आयओसीने स्वतःच्या अटींवर रशियाकडून कच्चे तेल विकत घेतले. यामध्ये तेल विक्रेत्याकडून भारतीय किनारपट्टीवर कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. मालवाहतूक आणि विम्याच्या व्यवस्थेतील निर्बंधांमुळे कोणतीही गुंतागुंत होऊ नये म्हणून ही अट घालण्यात आली होती.
भारत कच्च्या तेलाची ८५ टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करून भारताला ऊर्जा बिल कमी करायचे आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर मॉस्को स्वस्त दरात तेल आणि धातू आयात करताना दिसत आहे. याद्वारे निर्बंधांचा प्रभाव कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुणे हादरलं! गेल्या चार वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा, मामा करत होते ११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
काश्मीर फाईल्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी, आमिर खानच्या दंगलला मागे टाकत बाहुबली २ ला दिली टक्कर
राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा प्रतिहल्ला; म्हणाले, “शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”