पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उपसभापती कासिम सूरी यांच्या मदतीने विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर लगेचच इम्रान खान यांनी राष्ट्रपतींकडे नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस करून पाकिस्तानला घटनात्मक संकटात ढकलले आहे.
विरोधकांनीही आपला सभापती नेमून सर्वोच्च न्यायालयाचा आसरा घेतला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांच्या राजीनाम्याचे आणि नव्या नियुक्त्यांचे पर्व सुरू झाले आहे. दरम्यान, इम्रान खान यांनी आपण भारताच्या विरोधात नसल्याचा दावा केला आहे.
याआधीही इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती केली होती. इतकंच नाही तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही काश्मीरसह सर्व वादग्रस्त प्रश्न भारतासोबत चर्चेतून सोडवण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानातील अशांत वातावरणात पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण भारत किंवा अमेरिका विरोधी नसल्याचा दावा पुन्हा केला आहे.
‘डॉन’ने इम्रान खान यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘मी कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मी भारत किंवा अमेरिका विरोधीही नाही. अर्थात, आम्ही धोरणांच्या विरोधात असू शकतो. मला त्यांच्याशी मैत्री हवी आहे आणि या प्रक्रियेत परस्पर आदराची भावना असली पाहिजे.
केवळ कर्जबाजारी होऊन राष्ट्राने कधीही कोणत्याही देशाचे गुलाम होऊ नये, असे ते म्हणाले. अशा गुलामगिरीपेक्षा मृत्यु बरा असंही ते यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे, अतिशय नाट्यमय घडामोडीत, घटनेच्या कलम 5 च्या आधारे, नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांनी रविवारी इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला.
यानंतर पंतप्रधान इम्रान यांच्या सूचनेवरून राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी कनिष्ठ सभागृह बरखास्त केली. यानंतर नॅशनल असेंब्लीमध्ये स्पीकरची नियुक्ती करून विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आश्रय घेतला. सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी एक दिवस पुढे ढकलली आणि मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने या हायप्रोफाईल प्रकरणात ‘योग्य आदेश’ देण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?’, चित्रा वाघ कडाडल्या
..तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करू, ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत मोठे वक्तव्य
कौटुंबिक कार्यक्रमात मी फारसा हजर नसतो पण…; आदेश आणि सुचित्रा बांदेकरच्या मुलाची पोस्ट चर्चेत
बॅक टू बॅक दोन चित्रपट फ्लॉप होऊनही बाहुबली प्रभासला मिळाली हॉलिवूडची ऑफर; बनणार सुपरहिरो?