Share

इम्रान खान थेट उतरले शिवीगाळावर, पंतप्रधान मोदींनाही ओढले वादात; सभेतला व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. संपूर्ण विरोधी पक्ष सध्या इम्रान खान यांना सत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे इम्रान खानही आपले सरकार वाचले पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. (imran khan angry on modi)

आता इम्रान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते विरोधी पक्षांना शिवीगाळ करत आहे. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान मोदींवरही ताशेरे ओढले. पाकिस्तानमध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वत:वर झालेल्या टीकेनंतर फ्रंटफूटवर आले आहेत.

विरोधी पक्षांवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे तीन नेते डाकू आहेत. खैबर पख्तुनख्वा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, नवाझ शरीफ सत्तेत असताना त्यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवादी म्हटले होते, पण त्यांनी कधीही भारतीय पंतप्रधानांच्या वक्तव्याचा बदला घेतला नाही.

तसेच जर मी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे खटले बंद केले नाहीत तर ते माझे सरकार पाडतील असे ते मला सांगतात. पण मी त्यांना सांगतो की, यासाठी मला जीव द्यावा लागला तरी मी हे प्रकरण बंद करणार नाही. मी तुमच्या विरोधात राजकारण करत नाही, पण मी तुमचा भ्रष्टाचार उघडा करुनच राहीन असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/PTIofficial/status/1502588757094158338?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502588757094158338%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Finternational%2Fstory-pakistan-pm-imran-khan-abuses-opposition-leaders-drags-indian-pm-narendra-modi-6014108.html

११ मार्च रोजी भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात घुसल्याच्या घटनेवरही इम्रान खान यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, नवाझ शरीफ सत्तेत असताना त्यांनी कधीच भारतीय पंतप्रधानांविरोधात बोलले नाही, जे पाकिस्तानी लष्कराला दहशतवादी म्हणत होते.

नवाज यांनी परराष्ट्र कार्यालयाला भारताविरोधात वक्तव्ये न करण्याचे निर्देश दिले होते. परदेशात संपत्ती असलेल्या नेत्याने कधीही देश आणि त्याच्या अधिकारांचे रक्षण करण्यावर भर देणारे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवले नाही. पण मी कधीच कुणापुढे झुकलो नाही आणि तुम्हालाही कुणापुढे झुकू देणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
हा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; पीएफ वरील व्याजात प्रचंड घट
तुमचे एक पाऊल आणि १०० वर्षे मागे जाणार देश; रशियाच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीचा पुतीन यांना इशारा
‘जब तक सच जूते पहने..झूठ दुनिया घुमके आता है’; ‘द कश्मीर फाईल्स’ नंतर सलील कुलकर्णी असं का म्हणाले? वाचा…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now