सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत मिळून बंडखोरी केलेली आहे आणि ते सध्या गुवाहटीमधील ट्रायडंट या ७ स्टार हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिंदे गटाजवळ यावेळी ५० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अप्रत्यक्षपणे त्यांनी गुवाहटीतील बंडखोर आमदारांना आणि भाजपला टोले लगावले आहेत. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या खुप व्हायरल होत आहे. ते म्हणाले की, डोंगारफेमस तत्वनिष्ठ आमदारांची स्वामिनिष्ठ कहाणी काल सादर केली जात होती. हे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा पक्षांतर प्रवास करीत सध्या महासत्तेच्या गुवाहाटी कोंडवाड्यात आलेले आहेत.
याला म्हणतात पक्षनिष्ठा! ही त्यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे. पहिली टर्म पूर्ण..ज्यांना वर्षाकाठी लाखो रुपये पेन्शन मिळतेय नी आता दुसऱ्या टर्मला दरमहा लाखो रुपये वेतन व भत्ते मिळताहेत ते आमदार म्हणतात की, माझी बायको पाटलाची सून असून तिला नवं लुगडं ते घेऊ शकत नाहीत. किती ही गरिबी!
आमदारांना वर्षाला काही कोटी रुपये आमदार फंड मिळतो. तो सार्वजनिक कामांवर खर्च. करताना त्यातला किमान ३५% मलिदा ज्यांना व्यक्तिगत भेट म्हणून मिळतो, ते आमदार म्हणताहेत त्यांनी राजकारणासाठी घरादाराची राखरांगोळी केली असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. किती हा त्याग!
जे आपल्या निम्म्या वयाच्या विरोधीपक्ष नेत्यांना “आपला बाप” मानतात नी आसाम बापू त्यांच्याकडे मुलासारखे बघतात. दरवेळी आपल्यासाठी ते सढळ हाताने थैल्या पुरवतात. पण मुख्यमंत्री ठाकरे मात्र आपल्याला श्रद्धांजली सभेत बोलू देत नाहीत म्हणून आपण शिवसेना सोडली असे ते म्हणतात. जे आमदार गणपतराव देशमुख अकराव्या टर्मलासुद्धा एसटीच्या लालडब्याने फिरायचे त्यांना पाडून सत्ताधारी बनलेले हे आमदार.
आपल्या मतदार संघाला फक्त बारा कोटीच मिळाले किती हा अन्याव. ४पक्ष सोडणारे पक्षनिष्ठा शिकवणार, लाखो रुपये वेतन, पेन्शन घेत आमदार निधीतून मलिदा खाणारे बायकोला साधं लुगडं घेऊ शकत नाहीत, म्हणून अश्रू गाळणार. किती हा अन्याव! हे आहे अस्सल पेशवाई हिंदुत्व! असं ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांना जोरदार टोले लगावले आहेत.
करताना त्यातला किमान३५% मलिदा ज्यांना व्यक्तिगत भेट म्हणून मिळतो,ते आमदार म्हणताहेत त्यांनी राजकार्णासाठी घरादाराची राखरांगोळी केली असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते.किती हा त्याग!जे आपल्या निम्म्या वयाच्या विरोधीपक्ष नेत्यांना "आपला बाप" मानतात नी आसाम बापू त्यांच्याकडे(४)
— Prof. Hari Narke (@harinarke) June 27, 2022
महत्वाच्या बातम्या
दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून शाहरूखने अभिनेत्रीसोबत घालवली रात्र? गोंधळ सुरू होताच झाली होती अटक
“एकादशीला पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले”
मालेगावच्या नदीतून वाहताना दिसले रक्तमिश्रित पाणी, लोकांनी सांगितले धक्कादायक कारण
आजोबा झाल्यानंतर करण जोहर झाला भलताच खुश, म्हणाला, माझी बेबी आलिया भट्ट…