गुजरातमध्ये काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेले हार्दिक पटेल गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एका ट्विट केले आहे. ते म्हणाले की, देशसेवेच्या भक्ती कार्यात मी एक सैनिक म्हणून काम करेन. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यशस्वी पंतप्रधान म्हटले आहे. सध्या त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. (hardik patel tweet on narendra modi)
हार्दिक पटेल म्हणाले की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एक नवा अध्याय सुरू करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रसेवेत मी लहान सैनिक म्हणून काम करेन.
या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत असताना हार्दिक पटेल भाजपमध्ये सामील होत आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्यात भाजपची सत्ता आहे. २०१५ मध्ये, २८ वर्षीय हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंसक आंदोलनाचे नेतृत्व केले.
एकेकाळी भाजपचे कट्टर टीकाकार असलेले पटेल यांच्यावर गुजरातच्या तत्कालीन भाजप सरकारने देशद्रोहासह अनेक आरोपांवर गुन्हे दाखल केले होते. अशात हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सध्या राजकीय वर्तुळात त्यांची चांगलीच चर्चा आहे.
https://twitter.com/HardikPatel_/status/1532189431754547200?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1532189431754547200%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fstates%2Fgujarat%2Fgujarat-politics-hardik-patel-tweets-ahead-of-joining-bjp-2136909
भाजपमध्ये जाणारे हार्दिक पटेल २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. ११ जुलै २०२२ रोजी त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, यावर पटेल यांचे समाधान झाले नाही. राजीनामा देताना त्यांनी पक्षात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.
तसेच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसकडून आपल्या अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला जात होता, असेही म्हटले आहे. १८ मे २०२२ रोजी त्यांनी काँग्रेसवरील नाराजीमुळे काँग्रेसचा राजीनामा दिला. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने काँग्रेस सोडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी हार्दिकला पक्षात सामावून घेण्याबाबत भाजप खूपच उत्सुक आहे.
महत्वाच्या बातम्या-
शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली
सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील
कोल्हापूरच्या तरुणांना गोव्यात बेदम मारहाण; स्वस्तात जेवनाचे आमिश दाखवून लुटले पैसे अन् दागिने