Share

Hardik pandya : सूर्याच्या फटकेबाजीवर जळतोय हार्दीक पांड्या; म्हणतो त्याची फलंदाजी पाहून मी निराश, कारण..

Hardik pandya | शनिवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवची जबरदस्त फलंदाजी पाहून क्रिकेटप्रेमींना खुप आनंद झाला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने 91 धावांनी दणदणीत विजय नोंदवला आणि मालिका 2-1 अशी खिशात घातली.

टीम इंडियाच्या या दणदणीत विजयाचा नायक तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादव ठरला. स्फोटक फलंदाजी करताना त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकार मारले आणि 219.61 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 112 धावा केल्या. त्याचे टी-20 कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले. आता तो रोहित शर्माच्या 4 शतकांच्या विक्रमापासून फक्त 1 शतक दूर आहे.

या शानदार विजयानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, सूर्याने प्रत्येक डावात आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. फलंदाजी करणे किती सोपं आहे हे तो नेहमी आपल्या खेळीने सांगत असतो. मी त्याच्याविरोधात गोलंदाजी केली असती तर त्याची फलंदाजी पाहून मी स्वतः निराश झालो असतो.

मला राहुल त्रिपाठीचाही उल्लेख करावासा वाटतो, कारण त्याने अप्रतिम खेळी दाखवली. विशेषत: जेव्हा चेंडू स्विंग होत होता तेव्हा त्याने चांगली खेळी केली. मग स्कायने त्याचे क्षमता दाखवली. तुम्हाला सूर्याला काही सांगायची गरज नाही, त्याला जे काही करायचे आहे ते त्याला माहीत आहे. जर केव्हा अशी परिस्थिती आली की त्याला काय करायचं हे माहिती नसेल तर तेव्हा आम्ही चर्चा करतो. पण सहसा असं होत नाही कारण त्याला माहिती असते काय करायचं आहे.

अक्षर पटेलबद्दल हार्दिक म्हणाला की, तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो आणि खालच्या ऑर्डरमध्ये फटकेबाजी करतो त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो. यामुळे त्याला आणि संघालाही खूप आत्मविश्वास मिळतो. कर्णधार म्हणून माझ्या आयुष्याचे ध्येय माझ्या खेळाडूंना सपोर्ट करणे हे आहे.

तो भारताने तयार केलेला सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटू आहे आणि म्हणूनच आम्ही येथे आहोत. या स्वरूपामध्ये शंका घेण्यास जागा नाही. आम्ही खेळाडूंना योग्य पद्धतीने पाठिंबा देत आहोत. आम्ही मालिकेत ज्या प्रकारे खेळलो ते आनंददायी आहे, आम्ही दुसऱ्या सामन्यात आमचा 50 टक्केही खेळ केला नाही, तरीही आम्ही चांगली लढत दिली.

महत्वाच्या बातम्या
yogesh kadam : शिंदे गटातील आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे आहे बंगाली बाबाचे कनेक्शन; झाला मोठा खुलासा
‘ही’ गोष्ट जर उद्धव ठाकरेंना समजली तर ते आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलेने मारतील
urfi javed : आता चित्रा वाघ गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; महीला भाजप नेत्यावरून ऊर्फीने पुन्हा डिवचलं
‘मला माहितीय कॅन्सर आहे अन् मी ६ महीन्यात मरणार आहे’; पण माझ्या आईवडीलांना हे सांगू नका

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now