Share

Gulabrao patil : लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाला एकही जागा मिळणार नाही? गुलाबराव पाटलांचे सुचक वक्तव्य

Gulabrao Patil

Gulabrao patil | शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, भाजपच्या लोकसभा मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती दिसणार आहे. युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य  असणार आहे.

त्यात शुन्य जागा जरी आम्हाला लढवाव्या लागल्या तरी तो निर्णय आम्हाला मान्य राहील. ते असेही म्हणाले की, भाजपाचे मिशन १४५ असणार आहे पण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती असणार आहे. यात युतीच्या नेते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील.

यामध्ये शुन्य जागा जरी आम्हाला लढवावी लागली तरी तो निर्णय आम्हाला मान्य राहील, फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावा, असं गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊतांनी भाजपच्या लोकसभा मिशनवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही.

कुणीतरी मागच्या दरवाजाने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका त्यांनी केली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाने एका केटरर्सला धमकी दिली. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव असून असं करणं योग्य नाही. आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती व या क्लिप मधून एका व्यक्तीला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता. जर खरंच त्यांनी असं केलं असेल तर त्याची समज देवू असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसंदर्भात एक भावनिक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, मी मंत्रिमंडळात काम सुरू केल्यापासून सर्व गावांसाठी आम्ही पाण्याचं काम सुरू केलं. सर्व नागरीक खुश होते. लोकांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला.

ज्यावेळी शिवसेनेत हा प्रकार घडला. उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्विकारावा लागला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात दुखाचा क्षण आहे. असं म्हणत शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनातील खदखद बाहेर काढली.

महत्वाच्या बातम्या
sushma andhare : अमृता फडणवीसांचा स्विमिंगमधला फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघांना टोला; म्हणाल्या, नंगटपणा हा…
Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटलांनी फक्त ८ दिवसांत केले तब्बल ९ किलो वजन कमी; सांगितली भन्नाट ट्रिक 
जोडप्याचा होता हाॅटेलमध्ये मुक्काम; महीलेची पडद्याकडे नजर गेली अन् पायाखालची जमीनच सरकली
भारत vs श्रीलंका पहीला T20 सामना आज; वाचा कधी, कुठे आणि कसा Live पाहता येईल हा सामना

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now