Share

निवडणूक जिंकली तरी भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाला, कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी कामच केले नाही

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. आज या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या पाचही राज्यांमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजपनेच बाजी मारली आहे. गोव्यातही भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. (goa mp shocking statement on bjp workers)

गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. पण असे असतानाही पणजीतील भाजपचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात यांनी गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की, निकाल चांगला असला तरी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी नाही तर विरोधी उमेदवारासाठी काम केले आहे.

तसेच मी भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरोधात लढलो आहे. मात्र काही कार्यकर्ते आणि समर्थकांमुळे आम्ही जागा जिंकू शकलो, असे अतानसिओ यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आणि अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांचा ७०० मतांच्या फरकाने पराभव करून अतानासिओ यांनी पणजी मतदारसंघात विजय मिळवला.

अतानसिओ म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला पक्षात स्वीकारले नाही, असे मला वाटते. मी त्या दिशेने पाहतो. उत्पल पर्रीकर यांच्याबाबतही मोन्सेरात यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, उत्पल पर्रीकर यांना इतकी मते मिळू शकतात, कारण कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझे मत त्यांच्याकडे वळवले आहे.

तसेच भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यात भाजपच सरकार स्थापन करेल. आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेणार आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांकेलीम विधानसभेची जागा कमी मतांनी जिंकली आहे.

प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे. या जागेवरून सावंत सकाळपासून सतत पिछाडीवर होते. त्यांच्याशिवाय कळंगुट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मायकल लोबो यांनी भाजपच्या जोसेफ सिक्वेरा यांचा ४९७९ मतांनी पराभव केला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या-
केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर कार चढवलेल्या लखीमपूरमध्ये भाजपचं काय झालं? निकाल ऐकून धक्का बसेल
निवडणुकीतील पराभवाने निराश झालेल्या सपा नेत्याने विधानभवनासमोर स्वत:ला पेटवले
भाजपच्या ‘या’ रणनितींमुळे योगींना पुन्हा रचता आला इतिहास, जाणून घ्या कसे मिळाले भाजपला बहूमत

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now