Share

अंडरग्राऊंड झालेले गणेश नाईक प्रकटले, लैगिंक छळाच्या आरोपांवर म्हणाले, काहींना राजकारणात…

गेल्या काही आठवड्यांपासून भाजप आमदार गणेश नाईक हे चांगलेच चर्चेत आले आहे. पण काही दिवसांपासून ते कुठेच दिसून येत नव्हते. पण आता ते समोर आले आहे. त्यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारही नोंदवलेली आहे. (ganesh naik on women allegation)

गणेश नाईक यांचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीन मंजूर करत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर ते माध्यमांसमोर येणार असे म्हटले जात होते. आता ते समोर आले असून त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रियाही दिली आहे.

माझ्यावर लावण्यात आलेले सर्व गुन्हे एका षड्यंत्राचा भाग आहे. आपल्यावरचे सर्व आरोपही यावेळी त्यांनी फेटाळून लावले आहे. काहींना राजकारणात योग्य ते स्थान न मिळाल्यामुळे माझ्याविरोधात हे षड्यंत्र रचलं गेलं आहे, असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबईच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. जामीन मिळेपर्यंत ते माध्यमांसमोर आले नव्हते. आता प्रसार माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच महिलेने केलेल्या गंभीर आरोपांवर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर लवकरच सविस्तर बोलेल, असे गणेश नाईकांनी म्हटले आहे. अटकपूर्व जामीन देताना कोर्टाने काही अटी घातलेल्या आहे. त्यामुळे त्यांना कोणतेही वक्तव्य करताना सावधानतेने करावे लागणार आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मनपा आयुक्यांची भेट घेतली.

दरम्यान, दीपा चव्हाण नावाच्या महिलेने गणेश नाईकांवर गंभीर आरोप केले आहे. १९९३ पासून गणेश नाईकांचे माझेसोबत संबंध असल्याचे त्या महिलेने म्हटले होते. तसेच लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोपही त्या महिलेने केला होता. गणेश नाईकांपासून आपल्याला एक मुलगाही झाल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
असंच जर होत राहिलं तर आपली स्थिती श्रीलंकेपेक्षा वाईट होईल, मेहबूबा मुफ्ती भाजपवर कडाडल्या
‘पंचायत 2’ चा धमाल ट्रेलर झाला लॉन्च, पाहून पोट धरून हसले चाहते, तुम्ही पाहिला का?
योगी सरकारचं मुंबईत कार्यालय होणार, संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रसुद्धा लवकरच अयोध्येत आणि..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now