Share

कोरोनानंतर जगावर येणार ‘हे’ मोठे संकट; एका कीडा करणार संपूर्ण पृथ्वी नष्ट

सध्या कोरोनाच्या संकटाने जगभरात थैमान घातले आहे. पण हे संकट संपत नाही, की आणखी एक नवे संकट समोर उभे राहताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकाला करावा लागत आहे. पण आता एक अशी आपत्ती येणार आहे, ज्या आपत्तीचा माणसाच्या शरीरावर काही प्रभाव नाही होणार, पण त्याच्या जीवणावर नक्की याचा परीणाम होऊ शकतो. (flatworm danger for world)

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, किलर हॅमरहेड फ्लॅटवर्म्सच्या दोन नवीन प्रजाती आढळल्या असून ज्या भविष्यात खूप प्राणघातक ठरणार आहे. सध्या त्यांचा आवाका फक्त बागांपर्यंतच आढळून आला आहे. पण यावर उपाय लवकर सापडला नाही तर त्याची वाढ लवकरच स्वयंपाकघरात होऊ शकतो. ज्यामुळे माणसाच्या जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो.

हे आढळून आल्यानंतर काही दिवसांतच ते ३ नवीन देशांमध्ये दिसले आहेत. फ्लॅटवर्म असे या नवीन आपत्तीचे नाव आहे. या फ्लॅटवर्मची लांबी फक्त ३ सेमी. आहे. परंतु त्याच्या सर्वात मोठ्या प्रजातीची लांबी ३ फुटांपर्यंत असू शकते. ब्रिटीशांच्या बागांमध्ये आता फ्लॅटवर्म दिसू लागले आहेत.

तसेच त्याचा प्रसार झपाट्याने झाल्यास ब्रिटिश उद्यानांच्या जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते. वनस्पतींच्या आयात आणि निर्यातीमुळे, या फ्लॅटवर्मच्या १० पेक्षा जास्त प्रजाती आशियापासून जगभर पसरू लागल्या आहेत. फ्रान्स, इटली आणि आफ्रिकेतील एका बेटावर फ्लॅटवर्मची नवीन प्रजाती सापडली आहे.

गांडुळे आणि गोगलगाय हे या फ्लॅटवर्मचे मुख्य खाद्य आहे. आतापर्यंत ते बागांमध्ये दिसत आहे. परंतु त्यांच्या विस्तारासह, त्यांच्याकडे संपूर्ण उभे पीक नष्ट करण्याची क्षमता आहे. संशोधकांचा असा दावा आहे की, जशी उष्णता वाढेल तसतसा या कीटकांचा प्रादुर्भावही वाढेल आणि एकावेळी हजारोंच्या संख्येने संपूर्ण जमिनीत पसरू लागेल.

प्रोफेसर जीन-लू जस्टिन यांच्या मते, या प्रजाती अत्यंत धोकादायक आणि आक्रमक आहेत. त्यांची क्षमता इतकी आहे की, लवकरच ते जगभर पसरतील आणि जगभर आपले साम्राज्य प्रस्थापित करतील. या नवीन संकटामुळे शास्त्रज्ञांची चिंता आणखी वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘व्हेलेंटाईन डे’ ला सलमान खानसोबत असणार कतरिना, विकी कौशलपासून राहणार दूर
उत्साह जिवावर बेतला; शर्यतीत बैल उधळले आणि थेट घुसले प्रेक्षकांत, तीन जण गंभीर जखमी
budget 2022: आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार चालवणे होणार सोपे, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now