Share

शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा ताफा का अडवला? शेतकरी नेत्याने सांगितली संपूर्ण घटना..

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. या घटनेवरून देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या घटनेबाबतच्या अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय किसान युनियन (क्रांतीकारी) मान्य केले आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याचा मार्ग अडवला होता. बीकेयू क्रांतीकारीचे प्रमुख सुरजित सिंग फूल यांनी पंतप्रधान मोदींचा मार्ग रोखल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, सुरजित सिंग फूल यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी पीएम मोदींचा मार्ग रोखल्याचे सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये सुरजित सिंग म्हणत आहेत की, ” ५ जानेवारी या दिवशी फिरोजपूर-मोंगा महामार्गावरील रातखेडा गावात बीकेयू क्रांतीकारी संघटनेच्या सदस्यांनी मोदींच्या सभेच्या अवघ्या १०-११ किलोमीटर अंतरावर रास्ता रोको केला.”

“आम्ही सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करत, भाजप नेत्यांच्या धमक्यांना तोंड हे आंदोलन केलं आहे. या भाजपने दिल्लीत आमच्यावर पाण्याचा वर्षाव करून रस्ता खोदला होता. आता पंतप्रधानांना आम्ही त्या प्रकारचा दिवस बघायला भाग पाडलं आहे”, असे बीकेयू क्रांती सेनेचे सुरज सिंग यांनी सांगितले आहे.

पंजाबमधील आंदोलनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, हा व्हिडिओ कथितपणे बीकेयू क्रांतिकारी सेनेच्या कार्यकर्त्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या आंदोलनाच्या दरम्यान हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. या आंदोलनामुळेच पीएम मोदींचा ताफा महामार्गावरून पुढे जाऊ शकला नव्हता. या व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता पंतप्रधान यांना परत पाठवल्यानंतर आंदोलकांचे आभार मानत आहे.

“बंधुनो, दिल्लीत तुमच्यासमोर मोदींनी खिळे ठोकले होते, आज तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पायाखालची जमीन हिसकावून घेतली आहे. तुमच्या शक्तीने मोदींना रॅली काढू दिली नाही आणि त्यांना येथून हाकलून दिले. सर्व बांधवांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार”, अशा शब्दांत त्या कार्यकर्त्याने आंदोलकांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधानांच्या या घटनेवरून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी काल पत्रकार परिषदेत घेतली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरून परतावे लागले याचे मला वाईट वाटते. पण सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. दौरा रद्द करण्याचा निर्णय अंतिम क्षणी झाला”, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पंजाब घटनेवरून मराठी अभिनेत्याने पंतप्रधानांची उडवली खिल्ली, म्हणाला, “राजा पळपुटा निघाला…”
देशात ओमिक्रॉचा हाहाकार! महाराष्ट्र नंबर एकवर; एकाच दिवसात तब्बल ५६ % केसेस वाढल्या
२०२२ मध्ये शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर हे १० शेअर तुमच्याकडे हवेतच

राजकारण

Join WhatsApp

Join Now