Homeआर्थिक२०२२ मध्ये शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर हे १० शेअर...

२०२२ मध्ये शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर हे १० शेअर तुमच्याकडे हवेतच

शेअर बाजारात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगलीच तेजी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रात शेअर बाजाराने १२ वर्षांतील सर्वात मोठी तेजी गाठली. शेअर बाजारात सलग तीन दिवस तेजीची हॅटट्रिक पाहायला मिळाली. वर्षाच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी १. ६० टक्क्यांपर्यंत वाढले. २०२२ मध्ये शेअर बाजाराची तेजी कायम राहण्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे.

आयसीआयसीआय डायरेक्टरने अशा १० शेअरची यादी जाहीर केली आहे, ज्यामुळे या वर्षी गुंतवणूकदारांना पन्नास टक्के कमाई देऊ शकतात.आयसीआयसीआय डायरेक्टरच्या या यादीत पहिले नाव दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे आहे. सोमवारी, भारती एअरटेलचा शेअर NSE वर ७.९५ रुपयांवर चढून ६९१. ७५ रुपयांवर बंद झालेला पहिला मिळाला. आयसीआयसीआय डायरेक्टरचा अंदाज आहे की, २०२२ मध्ये तो ८६० रुपयांवर पोहोचू शकतो.

आयसीआयसीआयच्या (ICICI) डायरेक्टरांना असा विश्वास आहे की, रॅडिको खेतान स्टॉक,जो सध्या रुपये १,२२० च्या आसपास आहे, यावर्षी तो रुपये १,४५० पर्यंत पोहोचू शकतो. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, Eclerx सर्व्हिसेसचा शेयर्स २,९०० रुपयांपर्यंत पोहोचेल. जो की सोमवारी ६.८७ टक्क्यांनी वाढून २,७९१. ५० रुपयांवर बंद झाला. निफ्टीने १७,२०० चा टप्पा पार केला.

तसेच, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, RIL आणि L&T सारख्या शेअर्समुळे बाजारात उत्साह भरला आणि शेवटी बाजार तेजी सह बंद झाला. सर्वाधिक खरेदी आयटी, कॅपिटल गुड्स, इन्फ्रा, रिअॅलिटी आणि केमिकलमध्ये दिसून आली. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ४६ शेअर्सची खरेदी झाली, तर सेन्सेक्समधील (Sensex) ३० पैकी २७ शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे, निफ्टी बँकेचे १२ पैकी ९ शेअर्स वाढत बंद झाले.

लहान-मध्यम शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.९५ टक्क्यांच्या वाढीसह २४,६५३.८९ वर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक १. ४३ टक्क्यांच्या वाढीसह २८,५१४.९२ वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ४७७.२४ अंकांच्या किंवा ०८४ टक्क्यांच्या वाढीसह ५७,८५७.४८ वर बंद झाला, तर निफ्टी १४७.०० अंकांच्या किंवा ०.८६ टक्क्यांच्या वाढीसह १७,२३३.२५ वर बंद झाला.

दुसरीकडे, या यादीत असलेल्या ‘द फिनिक्स मिल्स’ या कंपनीचा स्टॉक ०.९५ टक्क्यांनी घसरून ९७६ रुपयांवर आला आहे. त्यामुळे ICICI डायरेक्टला हा शेयर १२०० रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता शेयर मार्केटमध्ये मोठ्या हालचाली आणि उलाढाली होणार असल्याची शक्यता या घडामोडींतून दिसत आहे. ब्रोकरेज फर्मला मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीलाही शेयर मार्केटमध्ये मोठा लाभ होण्याची आशा आहे. कारण या कंपनीचा शेयर १९.९९ टक्केवारीच्या उसळीसह २०२.३० रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे या प्रसिद्ध कंपनीला हा शेयर २२० रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
मराठीतील ‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच अडकणार विवाहबंधनात; प्री-वेडिंग फोटो आले समोर
पंतप्रधानांचा रस्ता अडवून आंदोलन करणारे कार्यकर्ते भाजपचेच? मलिकांनी थेट पुरावाच दाखवला
‘कपिल शर्मा शो’मधील कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण ऐकून तुम्हालाही अश्रू अनावर होतील