भाजप खासदार संजय पाटील (sanjay patil) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या मालकीच्या असलेल्या नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बील गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांना दिलेले चेकही बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
शेतकऱ्यांनी यावरून मोर्चा काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील घरावर शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता. संजय पाटील यांच्यासमोरच काही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट त्यांना सुनावले.
संजय पाटील यांनी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांनी थेट संजय पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी संजय पाटील उपस्थित होते. त्याचवेळी एका शेतकऱ्याचा संताप अनावर झाला. त्या शेतकऱ्याने थेट संजय पाटील यांना सुनावले.
शेतकरी म्हणाला की, मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तडफडून मेला. हे बरोबर नाही. वेळेवर पैसै मिळाले नाहीत म्हणून माझा भाचा गेला. त्यानंतर संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत सर्व थकीत बीले तुमच्या खात्यावर वर्ग करतो.मात्र शेतकरी आपल्या मतावर ठाम होते.
त्यांनी संजय पाटील यांचे म्हणणे मान्य केले नाही. आता १ हजार ५०० रुपये नाही तर २ हजार ८५० रुपये घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असे शेतकरी म्हणाले. तसेच तासगाव तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे, त्यामुळे हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरूवातीला मोर्चा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून विटा नाका येथे आला. मोर्चा नियोजित पणे खासदार संजय पाटील यांच्या घराकडे चालला होता, पण पोलिसांनी चिंचणी रस्त्यावर हा मोर्चा रोखला. यावेळी पोलिसांमध्ये आणि स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चा तेथेच रोखून ठेवला होता.
महत्वाच्या बातम्या
सचिनचा फॅन सुधीरला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण का झाली? धक्कादायक कारण आले समोर
कोरोनामुळे नोकरी गेली, ३ इंजिनीअर मित्रांनी सुरू केला चहाचा स्टॉल, आतात करतात बक्कळ कमाई
‘या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही, झोपही लागत नाही’; डिसले गुरूजींच्या डोळ्यात आलं पाणी
“गोव्यात शिवसेनेला कोणी ओळखत नाही, त्यांच्या सर्व उमेदवारांना १००० मतं पण नाही मिळणार”