नाशिक : महाराष्ट्रात ३० जानेवारीला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी नाशिक विधानपरिषदेच्या जागेबाबत रोज नवीन राजकीय हालचाली समोर येत आहेत. काँग्रेस पक्षाला व्हेंटिलेटरवर ठेवत तांबे पिता-पुत्रांनी अखेरच्या क्षणी बंडखोरी केली.
त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, तर वडील सुधीर तांबे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास नकार देत त्यांना मिळालेली उमेदवारी नाकारली. सध्या तांबे पिता-पुत्राला काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी दाखल करताना भाजपकडे पाठिंबा मागितला होता.
मात्र, भाजप तांबे यांना पाठिंबा देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अखेर देवेंद्र फडणवीस यांचा नवा डाव कोणता असेल? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये आणखी राजकीय नाट्य पाहायला मिळू शकते, असे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजप संभाजीराजे छत्रपतींच्या ‘स्वराज्य संघटने’च्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा नाशिकमध्ये आहे. असा दावा खुद्द स्वराज्य संघटनेचे अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. यानंतर सत्यजीत तांबेंची झोप उडाली आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि जनतेच्या नजरा नाशिक विधान परिषदेच्या जागेवर लागलेल्या आहेत. सत्यजीत तांबे यांनी हे सर्व बंड भाजपच्या इशार्यावर केले असेल तर भाजपने त्यांना आतापर्यंत पाठिंबा का दिला नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांची नवी निवडणूक रणनीती पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीस आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज यांची नाशिकमध्ये भेट होऊ शकते कारण दोन्ही नेते येथे भेट देणार आहेत.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत खरी लढत सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सुरेश पवार यांच्या दाव्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुरेश पवार म्हणाले की, आम्ही सर्व पक्षांचा पाठिंबा घेत आहोत.
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाशी चर्चा सुरू आहे. आगामी काळात नाशिक विधानपरिषद निवडणुकीत नवी राजकीय वाटचाल पाहायला मिळणार असल्याचे ते म्हणाले. या मुद्द्यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत शिंदे-भाजप युतीकडून अद्याप कोणालाही औपचारिक पाठिंबा मिळालेला नाही. नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या
सनी देओलच्या आगामी ‘गदर 2’ची स्टोरी लीक; यावेळी तारासिंग मुलासाठी पाकिस्तानात जाणार अन् त्यानंतर..
सूर्याने मोडला पाकिस्तानचा माज; बाबर-रिझवानला डावलून ICC ने सुर्याला दिले खास बक्षीस
रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन