बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सनी देओलचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गदर 2’ यावर्षी 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, कारण 21 वर्षांनंतर सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा पडद्यावर कशी दिसणार आहे.
आजच्याच दिवशी, 21 वर्षांपूर्वी जेव्हा ‘गदर’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा सर्वत्र फक्त तारा सिंग आणि सकिना यांचीच चर्चा होती आणि आता पुन्हा एकदा तारा-सकीनाला एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. लोक विचार करत आहेत की यावेळी चित्रपटाची कथा काय असेल?
दरम्यान, चित्रपटाची कथा लीक झाली आहे. पिंकविलाच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, ‘गदर 2’ची कथा 1970 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात सनीचा मुलगा ‘जीते’ म्हणजेच उत्कर्ष शर्मा यावेळी सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या वेळी तारा आपल्या पत्नीला भारतात परत आणण्यासाठी पाकिस्तानात गेली होता, तर, यावेळी तारा आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानची सीमा पार करेल. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने पोर्टलशी संवाद साधताना सांगितले की, ‘गदर’मध्ये तारा-सकिनाची प्रेमकथा प्रेक्षकांना दाखवण्यात आली होती.
दुसरीकडे, ‘गदर 2’ मध्ये अनिल शर्मा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला सादर करणार आहेत, ज्यामध्ये उत्कर्ष शर्मा भारतीय सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्राने पुढे सांगितले की, या लढाईदरम्यान तारा सिंगच्या मुलाच्या जीवाला धोका असेल आणि त्यानंतर तारा पुन्हा एकदा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानात प्रवेश करेल.
यावरून हे स्पष्ट होते की, ‘गदर’ची कथा तारा आणि सकिना यांच्या प्रेमकथेवर आधारित होती, तर ‘गदर 2’मध्ये अनिल शर्मा तारा-जीते म्हणजेच पिता-पुत्रातील प्रेम दाखवताना दिसणार आहेत. बरं, चित्रपटाची कथा काहीही असो, ‘गदर 2’च्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळणार यात शंका नाही, कारण या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची चाहत्यांनी बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा केली आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून तो चर्चेत राहिला आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अशा परिस्थितीत सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सनी देओलने सोशल मीडियावर ‘गदर 2’चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे. सनी ‘गदर’मध्ये हँडपंप उखडताना दिसला होता, यावेळी तो हातात हातोडा घेऊन दिसत आहे.
पोस्टरमध्ये सनी तारा सिंगच्या अवतारात डोळ्यात राग, हातात हातोडा आणि हिरव्या पगडीसह काळ्या कुर्तामध्ये दिसत आहे. पोस्टर पाहूनच सनी ‘गदर 2’ घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करणार असल्याचे दिसते. पोस्टर शेअर करताना सनी देओलने लिहिले की, ‘हिंदुस्तान जिंदाबाद है… जिंदाबाद था… और जिंदाबाद रहेगा!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सनी देओल तारा सिंहच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. सनीला त्याच जुन्या स्टाईलमध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या फोटोंमध्ये गुलजार खानही सनी देओलच्या शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात गुलजार खान यांनी तारा सिंगचा मित्र मुश्ताक खानची भूमिका साकारली होती.