Eknath shinde | शिंंदेंचे ठाकरेंना नुकताच उद्धव ठाकरेंचा गटप्रमुखांचा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात त्यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. त्यांनी मेळावा घेतल्यानंतर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून त्यांना उत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांनंतर गटप्रमुखांची आठवण आली का? आता गटप्रमुखांना अच्छे दिन आले, असा टोला त्यांनी लगावला.
महाविकास आघाडीचा निर्णय कसा चुकीचा होता याबद्दलही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या प्रत्येक टीकेचं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मुलं पळवणारी टोळी पाहिली होती पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणाऱ्यांची औलाद फिरत आहे.
त्यावर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं की, आम्हाला अभिमान आहे की आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
आज गटप्रमुख मेळाव्यादरम्यान शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात आलं. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसैनिकांवर विश्वास नाही म्हणून अशा प्रकारे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलं आहे. कंत्रांटी मुख्यमंत्री म्हटलं जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हो मी शेतकऱ्यांचं भलं करण्याचं, समाजाचा विकास करण्याचं कंत्राट घेतलं आहे.
आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत. खोके वगैरे बोलता, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल? हे सगळं महाराष्ट्रात बोलेन, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे शिंदे गटाला मिंधे गट म्हणाले होते त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत.
सरकार बनवण्यासाठी मिंधेपणआ कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कोण गेलं? हे महाराष्ट्र-देश बघतोय. तसेच शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नोकर समजलं किंवा तशी वागणूक दिली तर खपवून घेतलं जाणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवायची वेळ येणार नाही, तीन महिन्यांपुर्वी आसमान दाखवलं आहे, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, रक्त सांडलं तरी चालेल; उद्धव ठाकरे कडाडले
politics : रामदास कदमांवर चंद्रकांत खैरे चांगलेच भडकले!; पायातला बूट काढत म्हणाले, लोकं आता…
uddhav thackeray : आमच्या अंगावर आल्यास कोथळा बाहेर काढू, गद्दारांची लक्तरं काढणार; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
uddhav thackeray : आमच्या अंगावर आल्यास कोथळा बाहेर काढू, गद्दारांची लक्तरं काढणार; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल