Share

भाजप खासदाराचे नाव विसरले होते मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी पहा काय केलं

आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच वेगवेगळ्या विकास कामांवर आणि योजनांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. (eknath shinde forgot bjp mp name)

या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल कपातीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने पेट्रोलचे दर ५ रुपयांनी आणि डिझेलचे दर ३ रुपयांनी कमी केले आहे. तसेच शेतकऱ्यांना अनुदान, नगरपंचायत-बाजारसमितीच्या अध्यक्षांची थेट निवड यासारखे निर्णय जाहीर केले आहे.

तसेच पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वगळण्यात येणार नाही, असाही निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पण हा निर्णय जाहीर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे एक कागद सरकावला होता. सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे.

राज्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येते. पण पश्चिम महाराष्ट्रात पूर आला की कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येत होतं. याबाबतच्या तक्रारी खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केल्या होत्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे असं बोलत असताना यावेळी ते भाजपच्या एका खासदाराचे नाव विसरले होते. हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खिशातून एक कागद काढला. त्यांनी खासदाराचे नाव एका कागदावर लिहिले आणि ते शिंदे पुढे सरकवले. त्या कागदावर धनंजय महाडिक यांचे नाव लिहिलेले होते. ते मुख्यमंत्र्यांनी बघितले आणि लगेचच त्यांचे नाव घेतले आहे.

दरम्यान, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवलं जाऊ नये अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. या गोष्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही अनुदान दिले जावे असा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-
माझी पत्नी बन महिन्याला २५ लाख देतो, ‘या’ अभिनेत्रीला व्यावसायिकाने दिली होती मोठी ऑफर
सुशांत मृत्यू प्रकरण पुन्हा तापणार, आता बहिणीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली, मी त्याची रूम…
मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून आमदारांना पैशांचं आमिष, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now