संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई, अलिबागमधील ८ प्लॉट, दादरमधील १ फ्लॅट जप्त, राजकारणात खळबळ

ईडीने काही दिवसांपुर्वीच प्रवीण राऊत यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केलं आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. पण आता याच प्रकरणात संजय राऊतांवरही ईडीने फास टाकला आहे.

संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये जमिनीचे ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट या संपत्तीचा समावेश आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने ही कारवाई केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीकडून संजय राऊतांना हा सगळ्यात मोठा दणका मानला जात आहे.

बऱ्याच दिवसांपासून संजय राऊत ईडीवर सडकून टिका करत होते. त्यांच्यात आणि ईडीमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर ईडीने संजय राऊतांवर कारवाई करत अलिबागमधील ८ जमिनी जप्त केल्या आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे असं बोललं जात आहे.

दरम्यान, यावर स्वत: संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली आहे. त्यांनी भाजपवर सडकून टिका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, कष्टातून घेतलेल्या जागेच्या जप्तीची माहिती मिळाली. अलिबागमधील माझी जागा एक एकरचीसुद्धा नाही.राजकीय सुडभावनेतून ही कारवाई सुरू आहे.

माझं राहतं घर जप्त केलं.माझं घर जप्त केल्याने भाजपला आनंद झाला आहे असंही संजय राऊत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. तसेच ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी पहिलं ट्विटही केलं आहे ज्यामध्ये त्यांनी लिहीलं आहे की, असत्यमेव जयते!! दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

अनेक भाजप नेत्यांनी ईडीच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. जे १० वर्षांनंतर परत करण्यात आले आहेत असे समोर आले होते. याच पैशातून ही संपत्ती विकत घेतल्याचे बोलले जात आहे. प्रवीण राऊत यांना अटक झाल्यानंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकला होता.

महत्वाच्या बातम्या
मनसे नेत्याचा राज ठाकरेंना घरचा आहेर; म्हणाला, ‘राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही’
धक्कादायक! पुण्यातील सरकारी अधिकाऱ्यांचा अवैध कारभार उघडकीस, ४४ जणांवर कारवाई
फिरायला गेल्यावर बिकीनी घालणाऱ्या अभिनेत्रीने रमजान सुरु होताच घातला बुरखा; फोटो झाले तुफान व्हायरल
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले