Share

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून बागेश्वर बाबांना थेट आव्हान ; चमत्कार सिद्ध केल्यास देणार ३० लाख !

 Bageshwar Baba: बागेश्वर बाबा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. दिव्यशक्तीने आपण चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावा ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. बागेश्वर बाबांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवला तर त्यांना 30 लाख रुपये देण्यात येतील असे आव्हान श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना दिले आहे.

दरम्यान बागेश्वर बाबांनी हे आव्हान स्वीकारले असून ते चमत्कार सिद्ध करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र यासाठी मी नागपूरला येणार नाही. तुम्हीच रायपूरला या. इतकंच नाही तर श्याम मानव यांना येण्याजाण्याचं तिकीटही आम्ही देऊ. असे बागेश्वर बाबा म्हणाले आहेत.

सनातन धर्माची ताकद खूप मोठी असून ती कोणालाही समजणार नाही. छत्तीसगडी लोक अद्भुत आहेत आमचा चमत्कार पहायचा असेल तर त्यांनी रायपूरला यावे. आम्ही बंद दरवाजाआड काही करणार नसून जे करायचं ते उघड उघड करू. आमच्यासमोर एक नाही लाखो येतील, त्यांनीही यावं. असे म्हणत बागेश्वर बाबांनी श्याम मानव यांना आव्हान दिले आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना बागेश्वर बाबा यांनी धर्मांतरावर देखील वक्तव्य केले आहे. आम्ही लोकांचे धर्मांतर करत नसून त्यांची घरवापसी करत आहोत. डाव्या विचाराचे लोक आमच्या विरोधात आहेत. तर सनातनी लोक आमच्या सोबत आहेत. मात्र दरवेळी हिंदूंनाच का टार्गेट केले जाते. असे बागेश्वर बाबा म्हणाले आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा याना नागपूर मधील पत्रकार भवनमध्ये चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. यासाठी त्यांनी 30 लाख जाहीर केले असून बागेश्वर बाबांना 3 लाखांचे डिपॉझिट ठेवण्यास सांगितले आहे. “बागेश्वर बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास मी त्यांच्या पायावर माथा टेकून माझी संघटना बंद करेन,” असे श्याम मानव म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now