इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३० व्या सामन्यात युझवेंद्र चहल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. राजस्थान रॉयल्सच्या या फिरकी गोलंदाजाने हैराण करणारी कामगिरी करत हॅट्रिकसह ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने एकाच षटकात संपूर्ण सामनाच बदलला. (dhanashree varma on chahal hatrick viral video)
चहलच्या या कामगिरीमुळे राजस्थानने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी पराभूत केले. या स्पर्धेतील राजस्थानचा हा चौथा विजय होता. त्यामुळे हा विजय मिळवताच संजू सॅमसनच्या संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.
मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही चहलची पत्नी धनश्री वर्मा राजस्थानला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. यावेळी चहलची हॅट्रीक बघायला भेटल्यामुळे धनश्री खुपच खूश झाली होती. इतकंच नाही, तर ती थेट मैदानात नाचायला सुद्धा लागली होती.
https://twitter.com/IPL/status/1516113763505930241?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1516113763505930241%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-27415374244034238612.ampproject.net%2F2203281422000%2Fframe.html
गोलंदाजी करत असताना चहलने पॅट कमिन्सला बाद करून आपली हॅट्रीक पूर्ण केली. त्यावेळी धनश्रीला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत आणि तिने आनंदाने स्टँडवर उडी घेतली. तसेच भरमैदानातच नाचायला लागली. धनश्रीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
चहलने डावाच्या १७व्या षटकात जबरदस्त हॅट्रिक घेतली. त्या षटकात चहलने एकूण चार खेळाडूंना बाद करण्यात यश मिळविले. पहिल्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरला त्याने आऊट केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यरला, पाचव्या चेंडूवर शिवम मावीला आणि सहाव्या चेंडूवर पॅट कमिन्सला त्याने आऊट केले.
युझवेंद्र चहलने चार षटकांत ४० धावा देत पाच बळी घेतले. आयपीएल कारकिर्दीत चहलने एकाच सामन्यात पहिल्यांदाच ५ विकेट्स घेतल्या आहे. तसेच, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी हॅट्रीक घेणारा चहल हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अजित चंडिला, शेन वॉटसन, श्रेयस गोपाळ आणि प्रवीण तांबे यांना ही कामगिरी करता आली होती.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का, केंद्राला पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास शिवसेनेचा नकार
हिंगोलीत मध्यरात्री रक्तरंजित थरार, भाचीची छेड काढणाऱ्या तरुणाला मामाने दिला भयंकर मृत्यू
‘रावणाने सीतेचे अपहरण करून कोणताही मोठा गुन्हा केला नाही’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान