Share

फोडाफोडीला सुरवात! भाजपच्या महाडिकांनी केला मोठा गेम, शिवसेना आमदारांना ठेवलेल्या हॉटेलात जात..

सध्या राज्यसभेची सहावी जागा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत सहा जागा असताना भाजपने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक-एक उमेदवार उतरवला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेना यांच्या चुरस पाहायला भेटणार आहे. (dhananjay mahadik at hotel trident)

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपलाच विजय होणार असा दावा करताना दिसून येत आहे. सहावी जागा कोण जिंकणार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या निवडणूकीत कोणताही आमदार फुटू नये, त्यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर भाजपच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. १० तारखेला राज्यसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. असे असतानाच आता भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

शिवसेना आमदारांना ठेवण्यात हॉटेलमध्येच महाडिक काल रात्रीपासून होते, अशी हैराण करणारी माहिती समोर आली आहे. तसेच त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. भाजप उमेदवार शिवसेना आमदारांच्या हॉटेलमध्ये काय करतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शिवसेना आमदारांना ठेवण्यात आलेल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरु आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते देखील या बैठकांना उपस्थित राहताना दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हॉटेलमध्ये सर्वपक्षीय आमदारांची एक बैठकही घेतली होती.

अशात याच ट्राय़डंट हॉटेलमध्ये भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक मुक्कामाला असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. धनंजय महाडिकांनी त्या हॉटेलमध्येच रात्री मुक्काम ठोकला असल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच त्यांचे शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा झाल्याचेही म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
PUBG खेळू दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलाने गोळ्या झाडून केला आईचा खून, वाचून बसेल जबर धक्का
नुपूर शर्मांच्या वक्तव्यावरुन भडकले मुख्यमंत्री; म्हणाले, भाजपच्या या टिनपाट प्रवक्त्यांमुळे…
चंद्रकांत खैरे शिवसेनेच्या सभेआधी पैसे वाटताना…; मनसेचा पुराव्यासह गंभीर आरोप

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now