पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेबाबत जे घडले त्यानंतर पुर्ण देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर मोदींनीही एक विधान केले होते ज्यानंतर त्यांच्या विधानावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये अखिल भारत हिंदू महासभेनेही मोदींवर जोरदार टिका केली आहे.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र पांडे म्हणाले की, मोदींना एसपीजी सुरक्षा व्यवस्था दिली गेली असताना, अत्याधुनिक शस्त्रांसह जवान तैनात केले असताना आणि जॅमर व सेन्सर लावलेली बॉम्बप्रतिरोधक कार असतानाही मोदींनी मी जिवंत परत आलो असे विधान करणे योग्य नाही.
पुढे ते म्हणाले की, मोदी साहेब आता तुमच्यावर आणखी कसा भरवसा ठेवणार सांगा. त्यांनी एका निवेदनाद्वारे अशी विचारणा केली आहे. त्यांनी असेही लिहीले आहे की, राजशिष्टाचाराचा विचार न करता मोदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटायला गेले होते.
शरीफ यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी भेटवस्तूही दिल्या होत्या. तेच मोदी सुरक्षेसंदर्भात बोलत आहेत, अशी टिप्पणीही पांडे यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले आहेत की, पंजाबमधील मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला. त्यामुळे मोदींना पुलावर १५ मिनीटे थांबावे लागले.
पण त्या काळात सुरक्षा जवान आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार वा विसंवाद झालेला दिसला नाही. पण पंजाबमधील घटनेला कोण जबाबदार आहे हे लोकांसमोर आले पाहिजे व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मोदींना शारिरीक इजा पोहोचवण्याची मनीषा बाळगणाऱ्या लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या केली आहे.
हत्येचा कट रचणारे प्रपोगंडा करत नाहीत. अवघा देश मोदींच्या पाठीशी आहे पण राजकीय क्लृप्त्यांना लोकांनी बळी पडू नये, असेही पांडे यांनी निवेदनात म्हंटले आहे. मोदींच्या सुरक्षेत झालेल्या या चुकीमूळे पुर्ण देशातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनीही यावर बोलताना मोदींची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
शेअर मार्केटमध्ये घसरण होऊनही टाटांच्या या शेअरने मारली मुसंडी, एका वर्षात १ लाखाचे झाले ३२ लाख
११ वर्षापूर्वी उकडलेल्या शेंगांपासून सुरु झालेली कहाणी ‘अशी’ संपली; वाचा काय घडलं होत त्यावेळी….
नाम ही काफी है! शाहरूख खानचे नाव घेताच विदेशात भारतीय महिलेला मिळाली मोठी मदत
बदलणारा समाज! समलैंगिक विवाहदेखील थाटामाटात; गाजावाजासह निघत आहे मिरवणूक