Homeआर्थिक११ वर्षापूर्वी उकडलेल्या शेंगांपासून सुरु झालेली कहाणी 'अशी' संपली; वाचा काय घडलं...

११ वर्षापूर्वी उकडलेल्या शेंगांपासून सुरु झालेली कहाणी ‘अशी’ संपली; वाचा काय घडलं होत त्यावेळी….

कर्ज म्हणून पैसे घेऊन विसरणं अशी अनेकांना सवय असते. बाजारात जर तुम्ही महागड्या वस्तू कर्जाने घेत असाल तर त्याचे पैसे देणं अनिवार्यच असतं. मात्र एखादी छोटी-मोठी वस्तू असेल तर लोक विसरून जातात. आंध्रप्रदेशातील मोहनने अशाच प्रकारे उकडलेल्या शेंगा विकणाऱ्याकडून कर्जाने पैसे घेतले होते. तो नंतर विसरून गेला होता. मात्र 11 वर्षांनंतर त्यांनी आपल्यावरील ऋण फेडलं.

ही कहाणी 2010 मध्ये सुरू झाली होती. मोहन आपला मुलगा प्रणव आणि मुलगी सुचितासह आंध्रप्रदेशातील यू कोथापल्ली बीचवर फिरायला आले होते. येथे मोहनने आपल्या मुलांसाठी उकडलेल्या शेंगा खरेदी केल्या. मुलांनी शेंगा खाण्यास सुरुवातही केली. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मोहनच्या लक्षात आलं की, तो पर्स घरीच विसरला आणि त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते.

दुसरं कोणी असतं तर मोहनकडून पैसे घेऊनच सोडल असत. मात्र मोहनने पैसे दिले नाही आणि त्या शेंगा विकणाऱ्या दादानेही पैसे मागितले नाही आणि मोफतच शेंगा दिल्या. मोहनने त्याला सांगितलं की, मी लवकरच तुझे पैसे परत करतो. यावेळी मोहनने त्या व्यक्तीचा एक फोटोदेखील घेतला. नंतर मात्र मोहन हे विसरून गेला आणि तो अमेरिकेला परतला.

काही पैशांची गोष्ट असते अशावेळी अनेकजण विसरून जातात. 11 वर्षांनंतर मोहनची मुलं भारतात परत आली. आल्यानंतर भावा-बहिणींनी पहिल्यांदा त्या व्यक्तीकडे (सत्तैयाकडे)  जाण्याचं ठरवलं. त्याला शोधणं सोपं नव्हतं मात्र बहिणी-भावांनी मनात निश्चय पक्का केला होता.

यासाठी त्यांनी काकीनाडा शहराच्या आमदारांची मदत घेतली. काकीनाडा शहराचे आमदार चंद्रशेखर रेड्डी यांनी आपल्या मोबाइलवरुन फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यांची पोस्ट लवकरच व्हायरल झाली आणि काही लोकांनी आमदारांना सत्तैयाबद्दल माहिती दिली पण दुर्देवं म्हणजे आता तो या जगात नाही.

मात्र दोघा भावा-बहिणींनी आपलं वचन पूर्ण केलं. त्यांनी सत्तैयाच्या कुटुंबाला 25 हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये सुरू झालेली कर्जाची ही कहाणी 2022 मध्ये पूर्ण झाली. असे अगदी कमी लोकं असतात जे आपलं वचन किंवा आपल्यावरील एखाद्याचे उपकार विसरत नाही. त्यातीलच ही दोन मुले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या :-
बुली बाई ऍप: नेपाळी युवकाचे मुंबई पोलिसांना खुल्ले आव्हान, म्हणाला, हिम्मत असेल तर अटक करून दाखवा
पंजाबमधील रॅलीपेक्षा पीएम मोदींच्या पुनरागमनाचा भाजपला अधिक फायदा होईल का? जाणून घ्या
‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’

ताज्या बातम्या