केंद्र सरकार आणि ठाकरे सरकार हा वाद काही नवा नाही. अनेकवेळा उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच काहीसं आज घडलं. पेट्रोल डीझेलच्या दरावरून मोदींनी कोव्हिडविषयक बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमना मारला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तरात जीएसटीच्या थकीत रकमेची आठवण मोदींना करून दिली.
त्यानंतर राजकारण तापलं आणि भाजप नेते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. मोदींना उद्धव ठाकरेंनी दिलेलं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांना पचलं नाही आणि त्यांनी पुन्हा एकापाठोपाठ ३ ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात.
दोषारोप आणि जबाबदारी झटकणे, यापेक्षा दुसरं काही करणार तरी आहात का? असा तिखट सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. पुढे त्यांनी आणखी एक ट्विट करत असं म्हटलं आहे की, जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाजी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै २०२२ आहे.
मग जीएसटीची थकबाजी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना दुसऱ्या ट्विटमधून विचारला आहे. तिसरे ट्विट करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेजारच्या दीव-दमणमध्ये १०३ रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात १२० रुपयांना का? याचं उत्तर मिळालंच पाहिजे.
पंतप्रधान मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला, तत्काळ दिलासा द्या, अशी मागणीही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची पोलखोल करताच तुमचे अरुण्यरुदन सुरू असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली होती.
यावेळी मोदींनी गैरभाजपशासित राज्यांना पेट्रोल डिझेलच्या कर कपातीवरून सुनावलं. तसेच मोदींनी भाजपशासित राज्यातील पेट्रोलचे दरही त्यांना वाचून दाखवले. मोदींनी नाव न घेता महाराष्ट्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, गुजरात आणि कर्नाटकनं कर कमी करून हजारो कोटींचं नुकसान सहन केलं आणि शेजारच्या राज्यानं या काळात हजारो कोटी कमावल्याचा उल्लेख केला.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1519275359820484609?s=20&t=xoORrcMeSiY7-b1ypKoaXQ
महत्वाच्या बातम्या
किळसवाणे! ३० वर्षांपासून रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवला जातोय समोसा, अधिकाऱ्यांनाही बसला धक्का
‘या’ पाच कारणांमुळे बिघडला प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा खेळ, वाचा सविस्तर..
काश्मिरमध्ये भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली नमाज अदा, व्हायरल फोटोंनी जिंकली लोकांची मने
‘या’ पाच कारणांमुळे बिघडला प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा खेळ, वाचा सविस्तर..