राजकारण संपल्यात जमा होतं पण फडणवीसांना सेटींग लावली अन् नशीबच फळफळलं, थेट केंद्रात मंत्रीपद मिळालं

Politics: राजकारणात कुठल्याच गोष्टीची शाश्वती नसते. क्षणात माणूस उंचीवर असतो तर क्षणात खालीही. अगदी असंच काहीसं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत यांच्यासोबत देखील घडलं होत. गोपीनाथ मुंडे यांनी डॉ. भागवत यांना राजकारणात बोट धरून आणले. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर आपले राजकारणचं संपले असं डॉ. भागवत यांना वाटत होते.

याकाळात 2019 मध्ये डॉ.भागवत यांना एक दिवशी अचानक देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला व फडणवीसांनी भागवतांचा बायोडाटा मागवून घेतला. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून भागवत यांना राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी निरोप आला.

दरम्यान त्यावेळी डॉ. भागवत राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आणि आपले राजकारणच संपले असा विचार करणारे डॉ. भागवत थेट केंद्रीय अर्थमंत्री झाले. असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स तर्फे आयोजित वंजारी युवा सन्मान कार्यक्रमात, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील ही महत्त्वाची पाने उलगडली आहेत.

डॉ. भागवत यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच करून दिली होती. 1997 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने व पाठिंब्याने ते उपमहापौर झाले. नंतर 1999 मध्ये महापौर झाले. इतकंच नाही तर 2006 मध्ये सुद्धा त्यांना संभाजीनगरचा महापौर होण्याची संधी मिळाली होती.

कार्यक्रमा दरम्यान युवकांशी संवाद साधताना डॉ. भागवत यांनी यशाचा कानमंत्र सुद्धा दिला आहे. “प्रामाणिक प्रयत्न व स्मार्ट मेहनतीसोबत जिद्द ठेवली तर यश नक्कीच मिळते.” असे ते यावेळी म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी डिजिटल करन्सी बाबत महत्त्वाच्या बाबी देखील यावेळी सांगितल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या