सध्या कडाक्याची थंडी असल्याने घरोघरी शेकोटी पेटवली जात आहे. किंवा रुम हिटर लावले जातात. मात्र, हाच रुम हिटर एक नाही तर संपुर्ण कुटुंबाच्या जिवावर बेतला आहे. गॅस हिटर रात्रभर चालू ठेवल्यामुळे चौघा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हरियाणातील झज्जर शहरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दुधवाला दुध देण्यासाठी आला होता. त्यावेळी अनेकदा हाक मारुन देखील घरातून कोणीच बाहेर आले नाही. त्यामुळे दुधवाल्याच्या मनात शंका आली.
दुध वाल्याने घराच्या शेजार्यांकडे चौकशी केली. मात्र कोणालाच काही माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आले. तेव्हा चारही जण बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेले होते.
चौघांना बिस्व समाजाच्या हेल्थ सेंटरमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, रात्रभर गॅस हिटर चालू असल्यामुळे गुदमरून या चारही जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
शनिवारी रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. आसिफ, त्याची पत्नी शगुक्ता, मुलगा झैद आणि दोन वर्षांची मुलगी मायरा यांचा झोपलेल्या ठिकाणी मृत्यू झाला. कडाक्याची थंडी असल्यामुळे त्यांनी गॅस हिटलर रात्रभर चालू ठेवला होता. तर आसिफ आसिफ स्थानिक मदरशात लिपीक पदावर कार्यरत होता.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीची लाट आली आहे. तापमान प्रचंड कमी झाले आहे. तर पुढील 48 तासांपर्यंत तापमानाचा पारा आणखी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दाट धुक्यामुळे रेल्वे, विमानं विलंबाने असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- पंकजा मुंडे राजकारणातून संन्यास घेणार? स्वत:च म्हणाल्या, ‘संधी मिळत नसल्याने सन्मानाने बाहेर पडणे..
- BJP : भाजपमध्ये महीला सेफ नाहीत म्हणत महीला नेत्याने दिला राजीनामा; उर्फी चित्रा वाघांना डिवचत म्हणाली आता..