Share

मी पुन्हा येईल म्हटलो होतो, तसं आलोही पण काहींनी मला माजी करून टाकले- देवेंद्र फडणवीस

devendra fadanvis

एका पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम त्याच ठिकाणी घेण्यात आला जिथे देवेंद्र फडणवीस यांची २०१९ ची सभा झाली होती. याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल अशी शपथ घेतली होती. (devendra fadanvis talk about 2019 speech)

आता मी पुन्हा येईल याच वाक्याचा धागा डोरा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विरोधकांवर निशाणा साधला आहे. मी पुन्हा येईल म्हटलो होतो, तसं मी पुन्हा आलो, पण काहींनी मला माजी करून टाकले आहे, असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोरोना काळात राज्यातीन अनेक रुग्णालयांना भेट देऊन आलो. रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले. पण काही लोक घरी बसून टीका करत होते. काही असो पण मला माहित आहे, निधड्या छातीने आव्हानांना सामोरे जाणाऱ्यांनाच लोक आठवणीत ठेवतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आम्ही अडचणीच्या काळात लोकांपर्यंत गेलो होतो, त्यामुळे लोक आमच्या मागे आहेत, असा अप्रत्यक्ष टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

तसेच गोदावरी नदी वाहत राहिली पाहिजे. त्याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील दोन तृतीयांश भाग गोदावरी खोऱ्याने व्यापला आहे. नमामी गंगा प्रकल्पाच्या माध्यमातून नदी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेच्या अकराशे कोटींच्या कामाचे भूमिपूजन झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच नागपुरातील नाग नदीच्या स्वच्छतेसाठी १९०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. नमामी गोदा प्रकल्पासाठी देखील केंद्र सरकारकडून अकराशे कोटींचा आराखडा मंजूर करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-
एकतर नातवंडाचे तोंड दाखव नाहीतर…, मुलगा आणि सुनेविरोधात कोर्टात पोहोचले आई-वडील
पैशाच्या चणचणीमुळे साऊथच्या अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री; उपजीविकेसाठी करणार सफाईचे काम
नेत्यांना शोधून शोधून मारहाण, विरोधी-समर्थकांमध्ये जुंपली, पहा श्रीलंकेतील भयानक फोटो

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now