राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण सुरु आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा होती. पण आता कोर्टानेही यावर निकाल दिला आहे. ओबीसी आरक्षण न लावता निकवडणुका पार पाडाव्या आणि दोन आठवड्यात निकाल जाहीर करावा, अशी घोषणा कोर्टाने केली आहे. (devendra fadanvis challenge to court)
आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागणार आहे. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्यावर राज्यकर्त्यांचा विरोध आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. त्यानंतर आता भाजपनेही ओबीसी मेळावा घेतला आहे.
या ओबीसी मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सरकारने राजकीय आरक्षणाची कत्तल चालू केली असून यामागे मोठं षड्यंत्र आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
२०१० साली पहिल्यांदा कोर्टाने ५० टक्के आरक्षण देणार नाही, असं सांगितलं होतं ,पण तत्कालीन काँग्रेस सरकारने त्याविरोधात काहीही पाऊल उचलले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच भाजप उमेदवारांना ओबीसी आरक्षण देणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षण लागू होऊ किंवा नाही, पण भाजप २७ टक्के उमेदवारांना तिकीट देणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तसेच भाजपचा डीएनए ओबीसी असून याच समाजाच्या जीवावर पक्ष मोठा झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे लोक कोर्टात गेले. पण यामध्ये एक काँग्रेस आमदारांचा मुलगा तर दुसरा नाना पटोले यांचा कार्यकर्ता आहे. नाना पटोलेंशी संबंधित लोकांनी कोर्टाची पायरी चढली. त्यामुळे आरक्षण रद्द झालंय, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही केंद्राकडून डेटा घेतला. यासंदर्भात माहिती मिळवली. आता सरकार बदललं आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर न्यायमूर्ती चिडले आहे. याचवेळी या याचिकाकर्त्यांनी पुन्हा ट्रिपल टेस्टचा मुद्दा मांडला. ओबीसी आरक्षण हवं, तर ही ट्रिपल टेस्ट करावी लागेल, असे त्यांनी म्हटलं, पण हे आधीच करणं अपेक्षित होतं, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहरूख खानसोबत रोमान्स करताना दिसणार विकी कौशलची हिरोईन, मुंबईमध्ये सुरू झाली शुटींग
स्विमिंग पुलमध्येच कतरिनाने मारली पती विकी कौशलला मिठी, रोमँटिक फोटो होतोय तुफान व्हायरल
११ व्या वर्षी सुरू केली ऍक्टिंग; पती, मुलांना सोडून प्रियकरासोबत पळाली विदेशात, नंतर रस्त्यावर घालवले जीवन