भ्रष्टाचार घडल्याचे अनेक बातम्या समोर येत असतात. आता मुंबईमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावरील कस्टममधील अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये ४ कस्टम अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टममधील अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कस्टम अधिकाऱ्यांची मोडस ओपरेंडी लक्षात आल्यानंतर सीबीआयने कस्टम अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे प्रवाशांना माहितही नव्हते की, आपली लुटमार केली जात आहे. पुण्याची रहिवासी असलेली महिला मुंबईच्या विमानतळावर उतरली होती. ती दुबईहून आली होती. तिने परदेशात खुप गोष्टी विकत घेतल्या होत्या. त्यामुळे ती रेड चॅनेलमधून आऊट झाली होती.
कस्टम अधिकाऱ्यांनी त्या महिलेला बघितलं आणि तिला थांबवलं. तिच्याजवळ दीड तोळे सोन्याचा दागिना आणि एक आयफोन होता. त्यावेळी तुम्हाला पाच हजार रुपये भरावे लागतील असे त्या अधिकाऱ्याने त्या महिलेला म्हटले. त्यानंतर महिलेने त्या अधिकाऱ्याला पाच हजार रुपये गुगल पे केले.
दुसरीकडे एक केरळचा रहिवासी असलेला व्यक्ती मुंबई विमानतळावर पोहचला होता. तो ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडला होता. त्यावेळी अधिकारी त्याला म्हणाले की, तुझ्याकडे आयफोन आहे त्याचे कस्टम ड्युटी म्हणून २८ हजार रुपये भरावे लागतील. त्यावर मी ८ महिन्यांपूर्वी हा आयफोन घेतल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आणि आता मला तुम्हाला द्यायला तसेही पैसे नाहीत. त्यावेळी त्याला बळजबरीने ७ हजार रुपये गुगल पे करायला लावले.
अशात विमानतळावर होत असलेल्या लाचखोरीची माहिती सीबीआयला मिळालेली आहे. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने प्रवाशांना फोन करुन याबाबत चौकशी केली असता त्यांचा अंदाज खरा ठरला. त्यानंतर प्रवाशाची लेखी तक्रार करुन घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात मध्यरात्री १२ वाजता शरद पवार आंदोलनात रस्त्यावर, थेट शिंदेना..; जाणून घ्या नेमकं काय घडलं…
पुण्यात भीषण अपघातात अख्ख कुटूंब जागीच संपलं, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्यांवर काळाचा घाला
चालु ट्रेनमध्येच जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; प्रवाशांसमोरच सुरू केले शारीरिक संबंध, व्हिडीओ व्हायरल