पुण्यातील शिरूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका 4 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या अपघाताची भीषणता वाचून अंगावर अक्षरश काटा येईल.
सुदाम भोंडवे, त्यांची पत्नी सिंधू सुदाम भोंडवे, नात आनंदी अश्विन भोंडवे आणि सून कार्तिकी अश्विन भोंडवे अशी मृतांची नावे आहेत. मुलगा अश्विन सुदाम भोंडवे गंभीर जखमी असून त्याच्यावर शिरूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भोंडवे परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला. अपघातात संपूर्ण कुटुंब कारमध्ये अडकले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. मात्र, अपघातात सुदाम भोंडवे, सिंधू भोंडवे, आनंदी भोंडवे यांचा जागीच मृत्यू झाला.
भोंडवे कुटुंब बीड येथून पुण्यातील चाकण परिसरात इंडिका कारमधून अश्विन भोंडवे यांच्या मेहुण्याच्या घरी जात होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर फाळके मल्लाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली.
यात चालक अश्विन भोंडवे जखमी झाला, तर आई-वडील आणि चार वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. अश्विन भोंडवे यांच्या पत्नी कार्तिकी भोंडवे या गंभीर जखमी झाल्या. अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लाहिरी चौहान (उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत केली.
भोंडवे कुटुंबीय अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सुदाम भोंडवे यांनी बीडमधील डोमरी येथे सोंडारा गुरुकुल नावाची शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी नवीन पद्धती वापरल्या जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रमही राबवले जातात.
बीडमधील अनेक कुटुंबे वर्षातील सहा महिने उसतोडीचे काम करण्यासाठी जिल्हा सोडून राज्यातील इतर जिल्ह्यात भटकतात. याचा परिणाम त्यांच्या मुलांनाही भोगावा लागतो. यावर उपाय म्हणून 1986 मध्ये सोनदरा गुरुकुलची स्थापना करण्यात आली.
सोनदरा गुरुकुल या निवासी शाळेने सुरुवातीला बीडवर लक्ष केंद्रित केले होते, त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांतून त्याला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या शाळेने 1500 हून अधिक विद्यार्थी घडवले आहेत. सध्या 180 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे सर्व १६ आमदार अपात्र होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, एका झटक्यात तुमची वर्दी उतरवेल..’; पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन राडा
“काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसे सर देखील मला पायदळी तुडवतात”