गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडेच लागले आहे. पण दोन दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहे.
ही परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता जुन्या अभ्यासक्रमानुसार घ्यावी अशी मागणी केली आहे. अशात या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन सुद्धा लावला होता.
मंगळवारी रात्री ११ वाजता शरद पवार विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करु असे आश्वासन दिले आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये यासंबंधी बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे. पण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरुच ठेऊ असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. येत्या दोन दिवसांमध्ये यासंबंधी एक बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय जाहीर होईल.
पवारांशी चर्चा झाल्यानंतर आता ५ विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ पवार यांच्या नेतृत्वात जाणार आहे. एमपीएससीच्या मुख्य परिक्षेसाठी लागू करण्यात आलेला अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा. परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना ५-६ महिने वेळ देण्यात यावा, अशा काही मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात भीषण अपघातात अख्ख कुटूंब जागीच संपलं, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्यांवर काळाचा घाला
शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने बापाच्या नावाऐवजी लावले उद्धव ठाकरेंचे नाव; म्हणाला, ‘मी उद्धव ठाकरेंनाच…’
चालु ट्रेनमध्येच जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; प्रवाशांसमोरच सुरू केले शारीरिक संबंध, व्हिडीओ व्हायरल