Cricket : जवळपास लाखभर प्रेक्षकांचा कानावर आदळणारा गोंगाट, सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं आज कोलमडून पडल आहे. समोर इंग्लडचा तगडा संघ आणि त्यातही टि २० वर्ल्डकप २०२२च्या सामन्यात भारताचा झालेला पराभव पाहून क्रिकेट प्रेम नाराज झाले आहेत. टी २० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघासमोर १६९ धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाला तोंड देताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि त्यांनी या आव्हानाला सडेतोड उत्तर दिले. तसेच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांवर सध्या जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, असे म्हटले जाते आहे.
यानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंवर ओरडताना दिसला. त्याचवेळी या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जोस बटलरने ९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेटच्या मागून एक शॉट खेळला. चेंडूचा पाठलाग करताना, चेंडू हातात आल्यावर शमी त्याच्या मागे धावतो. पण त्यादरम्यान तो चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातात न देता भुवनेश्वर कुमारच्या हातात देतो.
त्यावेळी, चेंडू भुवीपासून दूर जातो. यानंतर रोहित शर्मा टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर जोरदार ओरडला.पराभवाचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासोबतच सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकात ५ गडी गमावून६८ धावा केल्या.
प्रत्युत्तरात फलंदाजी करताना इंग्लंड संघाने १० गडी राखून सामना जिंकला. इंग्लंड संघाकडून सलामीवीर बटलर आणि हेल्स यांनी अर्धशतकी खेळी खेळली. या सामन्यात भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी खुप प्रयत्न करत होते. परंतु, या सामन्यात भारताचा एकही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी ठरला नाही. या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
महत्वाच्या बातम्या –
टेनिस बॉल क्रिकेट खेळून टिम इंडीयाचा स्टार बनलाय हा ; क्रिकेटर, वर्ल्डकपमध्ये घालतोय धुमाकूळ