टाटा मोटर्सला भारतीय ग्राहकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. टाटा मोटर्स ही सध्या भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत कंपनीचे मार्केट शेअर १५ टक्के आहेत. नुकतेच टाटाने ह्युंदाई या कार निर्मात्या कंपनीला मागे टाकले आहे. त्यामुळे टाटा मोटर्स जागतिक बाजारात दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी झाली आहे.
आता टाटा मोटर्स कंपनीची खूप जास्त प्रसिद्ध असलेली एसयूव्ही टाटा नेक्सॉन या कारने डिसेंबर २०२१ मध्ये जबरदस्त विक्री केली आहे. टाटा नेक्सॉन या कारने बाकीच्या सर्व दिग्गज कंपन्यांच्या एसयूव्ही कारला मागे टाकून भारतीय बाजारपेठेत नंबर एकचे स्थान मिळवले आहे. डिसेंबर २०२१ या एका महिन्यामध्ये कंपनीने टाटा नेक्सॉनच्या १२ हजार ८८९ यूनिटची विक्री केली आहे.
या एका महिन्यामध्ये टाटा नेक्सॉन कारच्या विक्रीत ८८.७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये सध्या उपलब्ध आहे. या कारमध्ये १.२ लीटरचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११८ बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि १७० एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.
दोन्ही इंजिनमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन म्हणून स्टँडर्ड मिळते. तर यात ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हा ऑप्शन मिळतो. काही रिपोर्टनुसार, टाटा नेक्सॉन ही नंबर वन कार आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये मॅगनेट AC मोटर दिले आहे. यात पॉवरसाठी लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
या कारमध्ये दिली गेलेली लिथियम आयन बॅटरी लिक्विड कूल्ड आणि IP67 सर्टिफाइड आहे. म्हणजेच या कारची बॅटरी पाणी रोधक आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे या कारच्या बॅटरीवर पाणी आणि धुळीचा कोणताही परिणाम होत नाही. टाटा नेक्सॉन EV मध्ये 30.2 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे.
ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जिंगवर ३१२ किमी पर्यंत चालते. क्रेटा आणि ब्रेझा या दिग्गज कारला मागे टाकून टाटा नेक्सॉन ही नंबर वन एसयूव्ही कार बनली आहे. ही पूर्णतः भारतीय बनावटीची कार आहे. त्यामुळे सर्वत्र टाटा मोटर्सचे कौतुक होत आहे. टाटा मोटोर्सकडून आगामी काळात एसयूव्ही मालिकेतील नवीन कार लाँच करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
टाटाचा ‘हा’ शेअर करतो मालामाल, एका झटक्यात १२ हजारांचे झाले १ लाख
…तर मुंबईत लॉकडाऊन होणार; मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग यांचे मोठे वक्तव्य
अजितदादांचा मोठा निर्णय, पुण्यात पहिली ते आठवीच्या शाळा बंद