Homeआर्थिकटाटाचा 'हा' शेअर करतो मालामाल, एका झटक्यात १२ हजारांचे झाले १ लाख

टाटाचा ‘हा’ शेअर करतो मालामाल, एका झटक्यात १२ हजारांचे झाले १ लाख

२०२१ या वर्षात शेअर बाजारामध्ये खूप अस्थिरता दिसून आली. तरीही बाजारातील या सर्व चढ-उतारांच्या दरम्यान, असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. टाटा समूहाच्या या शेअरने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लि. या टाटा समूहाच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. अवघ्या एका वर्षात टाटा समूहाच्या टीटीएमएल या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीचा शेअर सध्या शेअर बाजारात २०६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.

एका महिनाभरापूर्वी म्हणजेच २ डिसेंबरला हा शेअर १२४ रुपयांवर होता. एका महिन्यात हा शेअर जवळपास दुप्पट झाला आहे. एका वर्षात टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड या शेअरने २६ पट जास्त परतावा दिला आहे. एका वर्षात हा शेअर ७.९० रुपयांवरून २०६.३५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे एक लाख आता २६ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. या शेअरने त्या गुंतवणूकदाराला श्रीमंत केले असते. गेल्या वर्षी जुलैमध्ये हा शेअर ५४ रुपयांवर होता आणि आता २०६ रुपयांवर आहे.

जर एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आता ही रक्कम ३.८१ लाख रुपये झाली असेल. म्हणजेच सहा महिन्यांत तिप्पट नफा या शेअरने त्या गुंतवणूकदाराला मिळवून दिला. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड हि टाटा टेलिसर्व्हिस या कंपनीची उपकंपनी आहे.

टीटीएमएल कंपनी तिच्या विभागातील बाजारपेठेत आघाडीवर आहे. ही कंपनी व्हॉईस, डेटा अशा सेवा पुरवते. टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसने अलीकडेच व्यवसायासाठी देशातील पहिली स्मार्ट इंटरनेट लीज लाइन सुरू केली आहे. याद्वारे अत्यंत कमी किमतीत हायस्पीड इंटरनेट नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जेणेकरून डेटा सुरक्षित ठेवता येईल.

महत्वाच्या बातम्या :-
अजितदादांचा मोठा निर्णय, पुण्यात पहिली ते आठवीच्या शाळा बंद
मास्क न घातल्यास ५०० रूपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रूपये दंड- अजित पवार
कुटुंबापेक्षा शिवसेनेला जास्त महत्व देणाऱ्या शिवसैनिकाने केली आत्महत्या, कारण वाचून डोळे पाणावतील